Sukhakarta Co-op Credit Society Bharti 2026 : सुखकर्ता को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड,मुंबई यांच्या अस्थापनेतील विविध पदांच्या भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.या भरती प्रक्रियेमध्ये पुढील प्रमाणे विभागीय व्यवस्थापक, मार्केटिंग व्यवस्थापक, लेखापरीक्षण अधिकारी, शाखा व्यवस्थापक, विकास अधिकारी आणि लिपिक या पदांची एकूण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
या भरतीची अर्ज प्रक्रिया 29 सप्टेंबर 2026 रोजी पासून सुरू झाली असून इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पद्धतीने 10 ऑक्टोबर 2026 या तारखेपर्यंत पाठवणे आवश्यक आहे.उपलब्ध माहितीप्रमाणे अर्ज ईमेल द्वारे स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज पाठवण्याआधी दिलेली संबंधित जाहिरात पीडीएफ मधील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
व्यवस्थापन, मार्केटिंग, ऑडिट, शाखा व्यवस्थापन, विकास विभाग तसेच लिपिकीय कामाचा अनुभव किंवा संबंधित शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांना या भरतीमध्ये विविध पदांचा विचार करता येऊ शकतो.
सुखकर्ता को-ऑप क्रेडिट सोसायटी भरती 2026 – थोडक्यात माहिती
तपशील माहिती
संस्थेचे नाव : सुखकर्ता को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., मुंबई
भरतीचे नाव : Sukhakarta Co-op Credit Society Bharti 2026
एकूण रिक्त जागा : 60
अर्ज सुरू होण्याची तारीख : 29 सप्टेंबर 2026
अर्जाची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2026
अर्ज करण्याची पद्धत : ई-मेलद्वारे
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
निवड प्रक्रिया : चाचणी आणि/किंवा मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ : sukhakartacredit.com
अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता admsukhakarta@gmail.com
पदानुसार रिक्त जागा
या भरतीमध्ये विविध जबाबदाऱ्यांशी संबंधित एकूण 60 जागा उपलब्ध आहेत. पदानुसार रिक्त पदांची संख्या खाली दिल्याप्रमाणे आहे.
| पदाचे नाव | रिक्त जागा |
| विभागीय व्यवस्थापक | 01 |
| मार्केटिंग व्यवस्थापक | 01 |
| लेखापरीक्षण अधिकारी | 01 |
| विभागीय व्यवस्थापक | 01 |
| शाखा व्यवस्थापक | 12 |
| विकास अधिकारी | 26 |
| लिपिक | 18 |
| एकूण | 60 |
पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे गरजेचे आहे. आणि किमान 50 टक्के गुण अपेक्षित आहे. यासोबत संगणकाचे आवश्यक ज्ञान असल्याचे नमूद केलेले आहे. काही संबंधित शैक्षणिक पात्रतांना प्राधान्य दिले जाणार असल्याचेही जाहिरातीमध्ये नमूद आहे त्यामध्ये खालील पात्रतेचा समावेश आहे
B.Com
B.Sc.
MBA
G.D.C.&A.
D.C.M
अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या आवश्यकतेची जुळते का हे पीडीएफ जाहिरात द्वारे तपासून घ्यावे.
अनुभवाची अट
त्या भरतीमध्ये वरिष्ठ पदांसाठी किमान तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे त्यामुळे व्यवस्थापक किंवा इतर वरिष्ठ जबाबदारीच्या पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या अनुभवाची माहिती अर्जामध्ये अचूकपणे नोंदवणे आवश्यक आहे. अनुभव संबंधातील आठ सर्व पदांची समान आहे असे गृहीत न धरता उमेदवारांनी ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी आवश्यक अनुभव अट दिलेल्या जाहिरातीत तपासावी.
विभागीय व्यवस्थापक (Divisional Manager) रिक्त जागा -01
विभागीय व्यवस्थापक पदाची एक रिक्त जागा दिलेली आहे. हे पद वरिष्ठ पातळीवरील जबाबदारीशी संबंधित असल्याने संबंधित उमेदवाराकडे आवश्यक शैक्षणिक पात्रतेबरोबर कामाचा अनुभव असावा.
मार्केटिंग व्यवस्थापक (Marketing Manager) – 01 जागा
मार्केटिंग व्यवस्थापक पदासाठी 1 जागा उपलब्ध आहे. संस्थेच्या व्यवसायवाढीशी संबंधित कामकाजात योगदान देऊ शकणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी हे पद आहे.
लेखापरीक्षण अधिकारी (Audit Officer) – 01 जागा
लेखापरीक्षण अधिकारी पदासाठी 1 रिक्त जागा आहे. अकाउंट्स, कॉमर्स किंवा ऑडिटशी संबंधित शैक्षणिक पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांसाठी हे पद संबंधित ठरू शकते.
विभागीय व्यवस्थापक (Divisional Manager) – 01 जागा
जाहिरातीप्रमाणे आणखी एका Divisional Manager पदासाची 1 जागा नमूद करण्यात आली आहे. एकूण जागांची संख्या मोजताना जाहिरातीत दिलेले पदनिहाय आकडेच ग्राह्य धरावे.
शाखा व्यवस्थापक (Branch Manager) – 12 जागा
शाखा व्यवस्थापक पदासाठी 12 जाग जाहीर करण्यात आल्या आहेत.शाखेतील दररोजचे कामकाज, कर्मचारी समन्वय, ग्राहकांशी संबंधित सेवा व संस्थेच्या कार्यशी निगडित जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी हे पद महत्त्वाचे आहे.
विकास अधिकारी (Development Officer) – 26 जागा
Development Officer या पदासाठी सर्वात जास्त म्हणजे 26 रिक्त पदे आहेत. त्यामुळे संबंधित पात्रता आणि आवश्यक कौशल्ये असलेल्या उमेदवारांसानी या पदासाठीच्या संधीचा लाभ घ्यावा.
लिपिक (Clerk) – 18 जागा
लिपिक या पदाच्या 18 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. कार्यालयीन नोंदी, कागदपत्रे, दैनंदिन प्रशासकीय कामकाज आणि संस्थेच्या कार्यपद्धतीप्रमाणे विविध सहाय्यक कामांशी हे पद संबंधित असू शकते.
वयोमर्यादा
दिलेल्या भरतीमधील माहितीप्रमाणे स्वतंत्रपणे निश्चित कोणतीही वयोमर्यादा नमूद केलेली आढळून येत नाही. त्यामुळे उमेदवाराने वयाची अट, लागू असल्यास शिथिलता आणि इतर वैयक्तिक पात्रता दिलेल्या संबंधित अधिकृत जाहिरात पीडीएफ मध्ये तपासावी.
महत्वाचे – वेबसाईट किंवा इतर अनधिकृत स्त्रोतांवर मिळणारी माहिती अंतिम समजण्यापेक्षा मूळ जाहिरातीमध्ये दिलेली अट ग्राह्य मानावे.
नोकरी ठिकाण
या भरतीचे नोकरी ठिकाण महाराष्ट्र असे दिलेले आहे संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध शाखा माहितीप्रमाणे मुंबई सह महाराष्ट्रातील इतर काही ठिकाणी संस्थेच्या शाखा आहेत.
उमेदवारांच्या अंतिम नियुक्ती नेमक्या कोणत्या शाखेत किंवा कार्यालयामध्ये होईल, याबाबत माहिती भरती प्रक्रियेतील संस्थेच्या सूचनानुसार निश्चित केली जाऊ शकते.
अर्ज कसा करता येईल?
Sukhakarta co-op credit society Recruitment 2026 मध्ये अर्जाची प्रक्रिया 29 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2026 आहे प्राप्त माहितीनुसार अर्ज हा ई-मेल पद्धतीने पाठवायचा असून अर्ज पाठवताना खालील बाबींना काळजीपूर्वक तपासावे.
अर्ज करण्याची सोपी पद्धत खालील प्रमाणे
- सर्वात अगोदर अधिकृत PDF जाहिरात डाऊनलोड करून पूर्ण वाचा.
- शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर अटी संबंधित पदासाठी लागू आहे का तपासावे.
- जाहिरातीनुसार आवश्यक माहिती असणारा अर्ज किंवा बायोडाटा तयार करावा.
- उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र जाहिरातीप्रमाणे अपेक्षित असलेले इतर कागदपत्रे तयार ठेवा.
- अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे योग्य पद्धतीने स्पष्ट दिसतील अशी स्कॅन करून ई-मेल मध्ये जोडावीत.
- दिलेल्या खालीलपैकी संबंधित ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावा.
- अंतिम ई-मेल पाठवण्याआधी अर्जामध्ये नाव, मोबाईल नंबर, ई-मेल, शैक्षणिक माहिती व अनुभवाची माहिती अचूक असल्याची खात्री करा.
- अर्ज ई-मेलवर पाठवल्यानंतर
- अर्ज पाठवल्यानंतर ई-मेलची Sent copy किंवा acknowledgement सेव्ह करून ठेवा.
अर्जाची पद्धत जाहिरातीत काही ठिकाणी Offline/Online by e-mail अशा मिश्र स्वरूपात नमूद असल्याने, अंतिम निर्णय मूळ जाहिरात PDF मधील सूचनेप्रमाणे घ्यावा.
अर्जाबरोबर कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत?
जाहिरातीत प्रत्येक पदासाठी स्वतंत्र कागदपत्रांची यादी दिलेली असल्यास तीच अंतिम मानावी.
साधारणपणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी खालील कागदपत्रांची तयारी करून ठेवणे उपयुक्त ठरू शकते:
- शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- अनुभव प्रमाणपत्र
- अद्ययावत Resume / CV
- ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- संबंधित प्रमाणपत्रे, लागू असल्यास
कागदपत्रे पाठवण्याआधी जाहिरातीमध्ये त्यांचा PDF/JPG format, file size किंवा इतर काही विशिष्ट नियम दिले आहेत का हे बघावे.
निवड प्रक्रिया
Sukhakarta Co-op Credit Society Bharti 2026 साठी उमेदवारांची निवड Test आणि/किंवा Interview या प्रक्रियेद्वारे होऊ शकते.
म्हणजेच पात्र उमेदवारांना संस्थेच्या निवड प्रक्रियेनुसार चाचणी, मुलाखत किंवा दोन्ही टप्प्यांना सामोरे जावे लागू शकते. निवड प्रक्रियेची तारीख, वेळ, ठिकाण आणि इतर सूचना संस्थेकडून पुढे कळविल्या जाऊ शकतात.
मुलाखतीसाठी बोलावले गेल्यास उमेदवारांनी त्यांच्या शिक्षणाशी तसेच संबंधित पदाच्या कामकाजाशी निगडित मूलभूत तयारी करणे उपयुक्त पडेल.
अर्जाची शेवट तारीख
या भरतीची अर्ज प्रक्रिया 29 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 ऑक्टोबर 2026
अंतिम दिवशी अर्ज पाठवण्यापेक्षा आवश्यक कागदपत्रे आणि माहिती आधीच तयार करून अर्ज दिलेल्या वेळेच्या आत पाठवणे सुरक्षित राहते. ई-मेलद्वारे अर्ज असल्यामुळे पाठविल्यानंतर Sent Mail मध्ये अर्ज योग्य ई-मेलवर गेला आहे का याची खात्री करावी.
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता : ई-मेल: [admsukhakarta@gmail.com]
पोस्टल पत्ता:
Divisional Office, Kokrud, Taluka Shirala, District Sangli.
कोकरूड शाखेचा पत्ता संस्थेच्या अधिकृत शाखा माहितीतही उपलब्ध आहे.
वेतन किती दिले जाणार ?
दिलेल्या भारतीय माहितीमध्ये प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र वेतन श्रेणी बद्दल माहिती नमूद केलेली नाही त्यामुळे निश्चित वेतन सांगणे योग्य ठरणार नाही उमेदवारांनी वेतन, मानधन किंवा सेवा अटीबाबत मूळ जाहिरातीमध्ये किंवा संस्थेकडून उपलब्ध करून दिलेल्या सूचनेत बघावी.
या भरतीसाठी चलन/अर्ज शुल्क आहे का?
उपलब्ध संदर्भातील माहितीमध्ये अर्ज शुल्काची स्पष्ट रक्कम नमूद केलेली नाही. त्यामुळे कोणतेही शुल्क भरावे लागणार आहे असे गृहीत धरू नये. अर्ज शुल्काबाबतची अधिकृत अट असल्यास ती जाहिरात PDF मध्ये तपासावी.
Sukhakarta Co-op Credit Society Bharti 2026 कोणासाठी उपयुक्त?
सदरील भरती विविध पदांची असल्यामुळे पदवीधर उमेदवारांसोबतच संबंधित अनुभवा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही संधी निर्माण करते. विशेषतः बी.कॉम, बीएससी, एमबीए, G.D.C.&A. किंवा D.C.M सारखी पात्रता असलेल्या उमेदवारांनी संबंधित पदासाठी अटी तपासून अर्जाचा विचार करता येईल.
त्याचप्रमाणे शाखा व्यवस्थापन, विकास, मार्केटिंग, ऑडिट किंवा कार्यालयीन कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या अनुभवाशी संबंधित पदांची माहिती जाहिरातीत नीट समजून घेणे महत्त्वाचे आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
| जाहिरात PDF | [येथे क्लिक करा] |
| अधिकृत वेबसाइट | [येथे क्लिक करा] |
प्रशांत हे Bhartipaper.com चे संस्थापक आणि लेखक आहेत. ते महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील सरकारी भरती, खासगी नोकऱ्या, अप्रेंटिसशिप आणि रोजगाराच्या संधींबाबत मराठी भाषेत माहिती प्रकाशित करतात.
भरतीविषयक लेख तयार करताना अधिकृत जाहिराती, संबंधित विभागांची संकेतस्थळे आणि अधिकृत सूचनांचा आधार घेऊन उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, रिक्त पदे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा यांची माहिती सोप्या व स्पष्ट मराठी भाषेत मिळावी, हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.
