SSC CHSL Recruitment 2026: कर्मचारी निवड आयोग अर्थात Staff Selection Commission (SSC) ने Combined Higher Secondary (10+2) Level Examination, 2026 ची जागा भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.या भरतीद्वारे केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग, कार्यालये तसेच काही घटनात्मक आणि वैधानिक संस्थांमध्ये गट-क मधील पदे भरली जाणार आहेत.
12 वी पास झालेल्या विद्यार्थी जे सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक आहेत तसेच सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची भरती संधी आहे.
या २०२६ च्या भरतीमध्ये सध्या सुमारे २,५३६ रिक्त जागा भारती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीची विशेष गोष्ट म्हणजे या भरतीसाठी बहुतांश पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही फक्त बारावी उत्तीर्ण अशी आहे. त्यामुळे बारावीनंतर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती नक्कीच महत्त्वाची आहे. मात्र अर्ज करण्यापूर्वी पात्रता, वयोमर्यादा आणि पदानुसार असलेल्या अटी उमेदवारांनी नीट समजून घेणे गरजेचे आहे.
SSC CHSL भरती २०२६ मध्ये कोणती पदे आणि आणि वेतन स्तर:
SSC CHSL ही एकच नोकरी नसून विविध केंद्र सरकारी पदांसाठी घेतली जाणारी संयुक्त परीक्षा आहे. यामध्ये मुख्यतः खाली दिलेल्या पदांचा समावेश आहे.
| पदाचे नाव | वेतन स्तर |
| कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) | स्तर-२ |
| डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) | स्तर-४ / स्तर-५ |
| डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ‘A’ | स्तर-४ |
LDC आणि JSA पदांसाठी वेतन स्तर-२ असून वेतनश्रेणी –१९,९०० ते ६३,२०० आहे. डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी पदानुसार स्तर-४ किंवा स्तर-५ लागू असून वेतनश्रेणी अनुक्रमे २५,५०० ते ८१,१०० आणि २९,२०० ते ९२,३०० आहे. डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ‘A’ साठी स्तर-४ लागू आहे.
एकूण जागा:
SSC ने CHSL २०२६ परीक्षेसाठी सध्यातरी अंदाजे २,५३६ तात्पुरत्या रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
मात्र ही संख्या गृहीत धरू नये संबंधित मंत्रालये आणि विभागांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिक्त जागांची अचूक संखे मध्ये बदल होऊ शकतो.
त्यामुळे उमेदवारांनी २,५३६ हा रिक्त जागांचा आकडा पकडू नये. पुढील काळात SSC च्या संकेतस्थळावर पदानुसार रिक्त जागांची संपूर्ण माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता:
SSC CHSL २०२६ साठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकतर पदांसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
LDC/JSA तसेच बहुतांश DEO आणि DEO ग्रेड ‘A’ पदांसाठी बारावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता असणे पुरेसे आहे.
मात्र काही विशिष्ट विभागांमधील DEO आणि DEO ग्रेड ‘A’ पदांसाठी विज्ञान शाखेतून बारावी आणि गणित हा विषय असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक पदासाठी आपली शैक्षणिक पात्रता लागू होते का, हे अर्ज करण्यापूर्वी तपासणे उमेदवारांसाठी महत्त्वाचे ठरेल.
बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थीही अर्ज करू शकतात. मात्र त्यांची शैक्षणिक पात्रता ही ७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण झालेली असणे हे महत्वाचे आहे.
वयोमर्यादा:
SSC CHSL २०२६ साठी सामान्य वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे. वयाची गणना १ ऑगस्ट २०२६ या तारखेनुसार केली जाणार आहे.
यानुसार उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट १९९९ पूर्वीचा आणि १ ऑगस्ट २००८ नंतरचा नसावा.
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळते. SC आणि ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC उमेदवारांना ३ वर्षांची कमाल वयोमर्यादेत सवलत आहे. PwBD आणि माजी सैनिकांसाठीही नियमानुसार सवलतीची तरतूद दिलेली आहे.
अर्जाची शेवटीची तारीख:
SSC CHSL २०२६ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ७ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ ऑक्टोबर २०२६ रात्री ११ वाजेपर्यंत असणार आहे.
ऑनलाइन अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर २०२६ रात्री ११ वाजेपर्यंत असणार आहे. अर्जामध्ये काही चूक झाल्यास १४ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत उमेदवारांना दुरुस्तीची संधी दिली जाणार आहे.
म्हणून उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज करण्याची घाई करण्यापेक्षा आधीच शेवटच्या तारखे आधीच अर्ज करणे योग्य राहिल.
अर्ज शुल्क:
SSC CHSL २०२६ साठी अर्ज शुल्क १००/- आहे. मात्र महिला उमेदवार तसेच SC, ST, PwBD आणि पात्र माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
अर्ज भरताना शुल्क लागू आहे की नाही, हे आपल्या प्रवर्गानुसार उमेदवारांनी तपासावे.
अर्ज कसा करायचा?
SSC CHSL २०२६ साठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी SSC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. SSC ने आपल्या अधिसूचनेत अधिकृत वेबसाइटसोबत My SSC मोबाईल ॲपद्वारे अर्ज करण्याची सुविधाही उपल्ब्ध करूनदिली आहे.
अर्ज करताना सर्वप्रथम One-Time Registration पूर्ण करावे.
त्यानंतर CHSL २०२६ परीक्षा निवडून वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, प्रवर्ग आणि परीक्षा केंद्राची माहिती भरून घ्यावी.
फॉर्म भरताना नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती आणि प्रवर्गाची माहिती प्रमाणपत्रांप्रमाणेच भरावी. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण फॉर्म पुन्हा एकदा तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
SSC CHSL २०२६ ची परीक्षा पद्धती:
- या भरतीमध्ये निवड प्रक्रिया मुख्यतः Tier-I आणि Tier-II अशा टप्प्यांमध्ये होणार आहे.
- Tier-I परीक्षा
- Tier-I ही संगणक आधारित परीक्षा असेल. यात इंग्रजी भाषा, सामान्य बुद्धिमत्ता, गणित आणि सामान्य जागरूकता या विषयांवर प्रश्न विचारले जातील.
- प्रत्येक विभागात २५ प्रश्न असून प्रत्येक विभागासाठी ५० गुण आहेत. म्हणजेच एकूण १०० प्रश्न आणि २०० गुण अशी परीक्षा असणार आहे.
- Tier-I मध्ये चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांकनाची तरतूद आहे. त्यामुळे फक्त जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यापेक्षा अचूक उत्तर देण्यावर लक्ष देणे परीक्षेत बसलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे ठरेल.
- Tier-II परीक्षा
- Tier-II मध्ये गणितीय क्षमता, तर्कशक्ती व सामान्य बुद्धिमत्ता, इंग्रजी भाषा व आकलन, सामान्य जागरूकता आणि संगणक ज्ञान या घटकांचा समावेश आहे.
- यानंतर संबंधित पदानुसार कौशल्य चाचणी किंवा टायपिंग चाचणी घेतली जाते. Tier-II मध्ये संगणक ज्ञान चाचणी आणि कौशल्य/टायपिंग चाचणी पात्रताधारित आहेत.
- LDC/JSA पदासाठी इंग्रजी टायपिंगचा वेग ३५ शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंगचा वेग ३० शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. DEO पदासाठी संबंधित कौशल्य चाचणीमध्ये संगणकावर डेटा भरण्याचा वेग तपासला जातो.
परीक्षा कधी होणार?
SSC ने CHSL २०२६ साठी अर्जाच्या तारखा जाहीर केल्या आहेत; मात्र Tier-I आणि Tier-II परीक्षेच्या निश्चित तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. त्या पुढील अधिकृत सूचनेद्वारे कळवण्यात येतील.
त्यामुळे सोशल मीडियावर किंवा इतर संकेतस्थळांवर फिरणाऱ्या अंदाजे परीक्षा तारखांवर विश्वास ठेवण्यापेक्षा SSC च्या अधिकृत वेबसाइटवरील अपडेट पाहणे योग्य ठरेल.
उमेदवारांनी अभ्यास कसा सुरू करावा?
जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल आणि SSC CHSL देण्याचा विचार करत असाल, तर अर्ज करण्यासोबतच अभ्यासालाही सुरुवात करा.
इंग्रजीसाठी व्याकरण, शब्दसंग्रह, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, वाक्य सुधारणा आणि आकलन यांचा सराव करा. गणितासाठी टक्केवारी, सरासरी, नफा-तोटा, वेळ-काम, वेळ-अंतर, गुणोत्तर आणि मूलभूत बीजगणित यांचा अभ्यास करा.
सामान्य बुद्धिमत्ता आणि सामान्य जागरूकतेसाठी रोज थोडा सराव करणे अधिक फायदेशीर ठरते. त्याचबरोबर LDC/JSA किंवा DEO पदाचा विचार करणाऱ्या उमेदवारांनी टायपिंग आणि संगणकावर काम करण्याचा सरावही सुरू ठेवावा.
फक्त परीक्षा जवळ आली की अभ्यास सुरू करण्यापेक्षा दररोज थोडा अभ्यास करण्याची सवय लावली तर तयारी अधिक व्यवस्थित करता येईल,आणि परीक्षेचा ताण येणार नाही.
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज सुरू: ७ सप्टेंबर २०२६
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: ७ ऑक्टोबर २०२६
- शुल्क भरण्याची अंतिम तारीख: ८ ऑक्टोबर २०२६
- अर्ज दुरुस्ती कालावधी: १४ ते १६ ऑक्टोबर २०२६
- Tier-I परीक्षा: नंतर जाहीर केली जाईल
- Tier-II परीक्षा: नंतर जाहीर केली जाईल
शेवटी एक महत्त्वाची गोष्ट…
बारावी झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना पुढे काय करायचे, याचा प्रश्न पडतो. काही जण पुढील शिक्षण घेतात, तर काही जण लगेच नोकरीच्या तयारीला लागतात, अशा विद्यार्थ्यांसाठी SSC CHSL सारख्या परीक्षा एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
यावेळी सुमारे २,५३६ तात्पुरत्या जागा जाहीर झाल्या आहेत. मात्र रिक्त जागांची संख्या अंतिम नसल्यामुळे पुढील अपडेटवरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या भरती पदासाठी जर तुम्ही पात्र असाल, तर अर्जाची शेवटची तारीख लक्षात ठेवून वेळेत अर्ज करा आणि त्याचवेळी अभ्यासालाही सुरुवात करावी.
SSC CHSL २०२६ साठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात एकदा पूर्ण वाचणे विसरू नका. विशेषतः DEO पदासाठी असलेली पदनिहाय शैक्षणिक अट, वयोमर्यादा आणि इतर आवश्यक बाबी तपासूनच अर्ज करावा.
अधिकृत माहिती आणि पुढील अपडेटसाठी SSC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत राहा.
| अधिकृत वेबसाईट [ Official Website ] | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
SSC CHSL अर्जाची शेवटीची तारीख?
08 ऑक्टोबर 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
SSC CHSL 2026 ची परीक्षा कधी होणार आहे?
SSC ने CHSL २०२६ साठी अर्जाच्या तारखा जाहीर केल्या आहेत; मात्र Tier-I आणि Tier-II परीक्षेच्या निश्चित तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. त्या पुढील अधिकृत सूचनेद्वारे कळवण्यात येतील.
SSC CHSL भरती 2026 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
SSC CHSL २०२६ साठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
SSC CHSL 2026 मध्ये एकूण किती जागा उपलब्ध आहेत?
SSC ने CHSL २०२६ परीक्षेसाठी सध्यातरी अंदाजे २,५३६ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
प्रशांत हे Bhartipaper.com चे संस्थापक आणि लेखक आहेत. ते महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील सरकारी भरती, खासगी नोकऱ्या, अप्रेंटिसशिप आणि रोजगाराच्या संधींबाबत मराठी भाषेत माहिती प्रकाशित करतात.
भरतीविषयक लेख तयार करताना अधिकृत जाहिराती, संबंधित विभागांची संकेतस्थळे आणि अधिकृत सूचनांचा आधार घेऊन उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, रिक्त पदे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा यांची माहिती सोप्या व स्पष्ट मराठी भाषेत मिळावी, हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.