CPRI Bharti 2026 : CPRI ने या भरतीसाठी जाहिरात क्रमांक CPRI/06/2026 प्रसिद्ध केली आहे. पात्र व या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2026 आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकरात लवकर अर्ज करावा.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था (CPRI) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या मध्ये एकूण 110 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या भरतीमध्ये इंजिनिअरिंग, विज्ञान, तांत्रिक तसेच इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे.
चला तर मग, या भरतीमध्ये नेमकी कोणती कोणती पदे आहेत, किती जागा आहेत, कोण अर्ज करू शकते, वयोमर्यादा किती आहे आणि अर्ज शुल्क किती आहे, हे सविस्तर या भरती ब्लॉग मध्ये जाणून घेऊया..
थोडक्यात CPRI भरती 2026:
- संस्थेचे नाव: केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था (CPRI)
- जाहिरात क्र.: CPRI/06/2026
- एकूण जागा: 110 जागा
- पदांची नावे: इंजिनिअरिंग ऑफिसर, इंजिनिअरिंग असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, टेक्निशियन व इतर पदे
- शैक्षणिक पात्रता: 10वी, ITI, डिप्लोमा, पदवी, B.E./B.Tech इ.
- वयोमर्यादा: 18 ते 25/28/30/35 वर्षे, पदानुसार
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
- अर्जाची अंतिम तारीख: 12 ऑक्टोबर 2026
- परीक्षा: तारीख नमूद नाही
CPRI भरती रिक्त जागा:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | सायंटिफिक असिस्टंट | 02 |
| 2 | टेक्निशियन ग्रेड I (इलेक्ट्रिकल) | 07 |
| 3 | टेक्निशियन ग्रेड I (मेकॅनिकल) | 02 |
| 4 | टेक्निकल अटेंडंट | 37 |
| 5 | असिस्टंट ग्रेड II | 29 |
| 6 | मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) ग्रेड-1 | 14 |
| 7 | इंजिनिअरिंग असिस्टंट (मेकॅनिकल) | 01 |
| 8 | इंजिनिअरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल) | 10 |
| 9 | इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड I (सिव्हिल) | 01 |
| 10 | इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड I (इलेक्ट्रिकल) | 07 |
| एकूण | 110 |
शैक्षणिक पात्रता:
या भरतीमध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे तुमची शैक्षणिक पात्रता कोणत्या पदासाठी लागू होते, हे अर्ज करण्यापूर्वी नक्की तपासा.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | सायंटिफिक असिस्टंट | 1.मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 2. 05 वर्षे अनुभव |
| 2 | टेक्निशियन ग्रेड I (इलेक्ट्रिकल) | ITI (इलेक्ट्रिकल) |
| 3 | टेक्निशियन ग्रेड I (मेकॅनिकल) | ITI (मेकॅनिकल) |
| 4 | टेक्निकल अटेंडंट | 10वी उत्तीर्ण |
| 5 | असिस्टंट ग्रेड II | 1.प्रथम श्रेणी BA/BSc./B.Com/BBA/BBM/BCA 2. मूलभूत संगणक अभ्यासक्रम (BCC) |
| 6 | मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) ग्रेड-1 | 10वी उत्तीर्ण |
| 7 | इंजिनिअरिंग असिस्टंट (मेकॅनिकल) | 1. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 2. 05 वर्षे अनुभव |
| 8 | इंजिनिअरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल) | 1. B.Sc. (Chemistry) 2. 05 वर्षे अनुभव |
| 9 | इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड I (सिव्हिल) | 1. प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Civil) 2. GATE 2024/2025/2026 |
| 10 | इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड I (इलेक्ट्रिकल) | Electrical / Electrical & Electronics Engineering शाखेमधून प्रथम श्रेणी B.E. किंवा B.Tech पदवी. GATE 2024, GATE 2025 किंवा GATE 2026 परीक्षेतील पात्रता आवश्यक. |
| एकूण | 110 |
दिलेल्या माहितीनुसार काही पदांसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारांना देखील संधी आहे.
१०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडे देखील या नोकरीची संधी उपलब्ध आहे .
तसेच एका पदासाठी प्रथम श्रेणीतील BA/B.Sc./B.Com/BBA/BBM/BCA यापैकी पदवी आणि मूलभूत संगणक अभ्यासक्रम (BCC) आवश्यक आहे.
या भरतीचा विशेष भाग म्हणजेच या भरतीमध्ये फक्त इंजिनिअरिंग पदवीधारकांनाच नाही, तर ITI, डिप्लोमा, विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन तसेच 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठीही या भरती मध्ये संधी उपलब्ध आहे.
वयोमर्यादा:
CPRI भरती 2026 साठी वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. उमेदवाराचे वय 12 ऑक्टोबर 2026 रोजी पासून विचारात घेतले जाणार आहे.
यभारतीसाठी तुम्ही १८ वर्षं ते ३५ वर्ष ही वयोमर्यादा आहे.
- इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड I (इलेक्ट्रिकल) : 18 ते 30 वर्षे
- इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड I (सिव्हिल) : 18 ते 30 वर्षे
- टेक्निकल अटेंडंट : 18 ते 30 वर्षे
- असिस्टंट ग्रेड II : 18 ते 30 वर्षे
- इंजिनिअरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल) : 18 ते 35 वर्षे
- इंजिनिअरिंग असिस्टंट (मेकॅनिकल) : 18 ते 35 वर्षे
- सायंटिफिक असिस्टंट : 18 ते 35 वर्षे
- टेक्निशियन ग्रेड I (इलेक्ट्रिकल) : 18 ते 28 वर्षे
- टेक्निशियन ग्रेड I (मेकॅनिकल) : 18 ते 28 वर्षे
- मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) ग्रेड-1 : 18 ते 25 वर्षे
आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क:
- पद क्र. 1 ते 5 साठी:
- GEN/OBC/EWS – ₹1,000
- SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही
- पद क्र. 6 ते 10 साठी:
- GEN/OBC/EWS – ₹700
- SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही
त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुम्ही कोणत्या प्रवर्गात येता आणि कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात, यानुसार शुल्क तपासणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया:
CPRI भरती 2026 साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावे लागेल उमेदवारांनी संबंधित अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रथम जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतर पात्रता तपासून ऑनलाइन अर्ज भरावा.
अर्ज भरताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, GATE किंवा इतर आवश्यक माहिती न चुकता भरावी. आवश्यक कागदपत्रे योग्य पद्धतीने अपलोड करावीत. अर्ज शुल्क लागू असल्यास ते ऑनलाइन भरावे आणि अर्ज अंतिम स्वरूपात जमा केल्यानंतर त्याची प्रत भविष्यासाठी जतन करून ठेवावी.
अर्जामध्ये एखादी माहिती चुकीची भरली गेल्यास पुढील प्रक्रियेत अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे घाई न करता अर्ज भरलेला प्रत्येक तपशील एकदा तपासून घेणे योग्य ठरेल.
महत्त्वाची तारीख:
अर्जाची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2026
परीक्षेची तारीख सध्या उपलब्ध माहितीनुसार नमूद करण्यात आलेली नाही. परीक्षेबाबत किंवा पुढील निवड प्रक्रियेबाबत अधिकृत संस्थेकडून त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध होणारे अपडेट उमेदवारांनी तपासणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण:
या भरतीमधून निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरीची संधी मिळू शकते. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये काम करण्याची तयारी असणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची ठरू शकते.
उमेदवारांसाठी महत्वाचे मुद्दे:
सरकारी भरतीचा अर्ज भरताना केवळ पात्रता पाहणे पुरेसे नसते, संबंधित पदासाठी अनुभवाची अट आहे का? GATE आवश्यक आहे का? वयाची व इतर कोणती महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत. हे पण तपासणे आवश्यक आहे. ती माहित व्यवस्थित पाने वाचून उमेदवारांनी अर्ज करावा.
विशेषतः CPRI भरतीमध्ये काही पदांसाठी 5 वर्षांचा अनुभव, तर इंजिनिअरिंग ऑफिसर पदांसाठी GATE पात्रता आवश्यक आहे. त्यामुळे आपली पात्रता संबंधित पदाशी जुळते का, हे अर्ज करण्यापूर्वी नक्की तपासा.
तसेच अंतिम तारखेपर्यंत अर्ज करणे शक्य असले तरी शेवटच्या दिवशी संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येऊ शकतात.म्हणून ऑनलाईन अर्ज ची प्रक्रिया होईल तेवढ्या लवकर पूर्ण करणे सोयीचे ठरेल.
शेवटी…
सरकारी आणि तांत्रिक क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी CPRI 2026 ही भरती लक्षवेधी आहे. विशेषतः इंजिनिअरिंग, डिप्लोमा आणि ITI केलेल्या उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार उपलब्ध पदांची माहिती तपासावी. त्याचबरोबर विज्ञान आणि इतर पदवीधारक उमेदवारांसाठीही काही पदांवर संधी उपलब्ध आहे.
मात्र अर्ज करण्यापूर्वी CPRI ची अधिकृत जाहिरात एकदा पूर्ण वाचणे अत्यंत आवश्यक आहे. पदांची पात्रता, अनुभव, पदसंख्या, आरक्षण, वयोमर्यादा आणि इतर अटींमध्ये अधिकृत जाहिरातीत दिलेली माहितीच अंतिम मानली जाईल. त्यामुळे अधिकृत वेबसाईट पाहणे ही आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2026 असल्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा.
पात्र उमेदवारांनी आपल्या पदाची पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतन आणि इतर अटी अधिकृत जाहिरातीतून तपासल्यानंतरच अर्ज करावा. भरतीशी संबंधित माहितीमध्ये बदल झालेला असल्यास तो अधिकृत संस्थेच्या सूचनेनुसारच ग्राह्य धरावा. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आणि अधिकृत जाहिरातीतील माहितीला ग्राह्य धरून अर्ज करणे आवश्यक आहे.
| अधिकृत वेबसाईट [ Official Website ] | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
प्रशांत हे Bhartipaper.com चे संस्थापक आणि लेखक आहेत. ते महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील सरकारी भरती, खासगी नोकऱ्या, अप्रेंटिसशिप आणि रोजगाराच्या संधींबाबत मराठी भाषेत माहिती प्रकाशित करतात.
भरतीविषयक लेख तयार करताना अधिकृत जाहिराती, संबंधित विभागांची संकेतस्थळे आणि अधिकृत सूचनांचा आधार घेऊन उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, रिक्त पदे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा यांची माहिती सोप्या व स्पष्ट मराठी भाषेत मिळावी, हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.