Bank of India BOI Bharti 2026: बँक ऑफ इंडियामध्ये 205 पदांसाठी मोठी भरती; अधिकारी, व्यवस्थापक, अभियंता आणि इतर पदांसाठी संधी!

Bank of India BOI Bharti 2026: बँकेत नोकरी करण्याची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ इंडिया (BOI), मुंबई अंतर्गत विविध विभागांमध्ये तब्बल 205 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक पदांसोबतच कायदा अधिकारी, अग्निशमन अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि स्थापत्य अभियंता अशा विविध पदांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे या भरतीमध्ये अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक अशा वेगवेगळ्या स्तरांवर काम करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे संबंधित शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनसाठी ही महत्वाची भरतीची संधी आहे .

या भरतीसाठी सुरुवातीला 25 सप्टेंबर 2026 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आली होती.
मात्र आता वेबसाईट वर असलेल्या माहितीनुसार अर्जाची अंतिम तारीख वाढवून 5 ऑक्टोबर 2026, रात्री 11:59 वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी अजून एक संधी आहे; मात्र शेवटच्या तारखेला सर्व्हर वर ट्रॅफिक असू शकतं त्यामुळे शेवटच्या तारखे आधी अर्ज करण्याचा प्रयत्न उमेदवारांनी करावा.

थोडक्यात BOI भरती 2026:

  • संस्था| बँक ऑफ इंडिया
  • एकूण पदे – 205
  • पदांचे प्रकार – Chief Manager, Senior Manager, Manager, Officer व इतर
  • शैक्षणिक पात्रता – पदानुसार Graduate, B.Sc., B.E./B.Tech, MCA, M.Sc. इ.
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धत – ऑनलाइन
  • वेतन – 48,480 ते 1,20,940
  • अर्ज शुल्क – 175 / 1,180
  • अर्ज सुरू – 10 सप्टेंबर 2026
  • अंतिम तारीख – 5 ऑक्टोबर 2026, रात्री 11:59
  • निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा आणि/किंवा मुलाखत

BOI भरती 2026 मध्ये एकूण जागा:

बँक ऑफ इंडिया भरती 2026 अंतर्गत एकूण 205 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांमध्ये तंत्रज्ञान आणि माहिती सुरक्षा क्षेत्रातील मोठ्या संख्येने पदांचा समावेश आहे.

रिक्त जागा:

मुख्य व्यवस्थापक पदे :

  • मुख्य व्यवस्थापक (Full-Stack Engineering) – 2 जागा
  • मुख्य व्यवस्थापक (Digital Platforms) – 1 जागा
  • मुख्य व्यवस्थापक (Supply Chain, Trade Finance Technology) – 1 जागा
  • मुख्य व्यवस्थापक (Digital Banking Operations) – 2 जागा
  • मुख्य व्यवस्थापक (IT Procurement, Contracts & SLA Management) — 1 रिक्त पद
  • मुख्य व्यवस्थापक (IT Officer with CISA/CISM/CISSP) – 1 जागा
  • मुख्य व्यवस्थापक (Information Security) – 2 जागा

वरिष्ठ व्यवस्थापक पदे :

  • Full-Stack Engineering
  • Digital Platforms
  • Finacle Application Support
  • Infrastructure Operations
  • Solution & Technology Architecture
  • Data Engineering
  • API Governance & Security
  • IT Procurement
  • DevSecOps Engineering
  • , Database Administration
  • Information Security आणि CISA/CISM/CISSP पात्रता असलेल्या IT Officer
  • पदांसाठी एकूण विविध जागा उपलब्ध आहेत.

व्यवस्थापक पदे :

  • Full-Stack Engineering
  • Digital Platforms
  • Application Support & Operations
  • Infrastructure Operations
  • IT System Administrator
  • Automation Testing
  • IT Project Manager
  • , Business Analysis
  • Data Analytics, DevSecOps Engineering
  • UI/UX Design
  • Emerging Technology & Innovation
  • Database Administration
  • Information Security
  • यांसह अनेक विभागांमध्ये व्यवस्थापक पदे आहेत.

याशिवाय Law Officer – 10, Fire Officer – 2, Security Officer – 10, Civil Engineer – 10 अशी पदेही आहेत.

तसेच Officer स्तरावर Full-Stack Engineering, Application Support & Operations, Data Analytics, Data Engineering, QA & Test Engineering आणि Information Security या विविध क्षेत्रांमध्येही पदांची उपलब्धता आहे.

अर्ज :

या भरतीमध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. त्यामुळे सर्व 205 रिक्त पदांसाठी एकच पात्रता लागू होत नाही.

तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक पदांसाठी B.E./B.Tech, MCA, M.Sc., B.Sc. किंवा संबंधित पदवी आवश्यक आहे. काही वरिष्ठ पदांसाठी संबंधित क्षेत्रातील अनुभवासोबत विशेष प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे.

विशेषतः CISA, CISM किंवा CISSP यांसारखी माहिती सुरक्षा क्षेत्रातील प्रमाणपत्रे असलेल्या उमेदवारांसाठी काही स्वतंत्र पदे उपलब्ध आहेत. बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत भरती कागदपत्रांमध्येही अशा पदांसाठी संबंधित तांत्रिक पात्रता, प्रमाणपत्रे आणि अनुभवाच्या अटी नमूद केलेल्या आहेत.

कायदा अधिकारी पदासाठी संबंधित कायद्याची शैक्षणिक पात्रता, तर स्थापत्य अभियंता पदासाठी संबंधित अभियांत्रिकी पात्रता आवश्यक आहे.

त्यामुळे केवळ पदाचे नाव पाहून अर्ज करण्याऐवजी आपल्या शिक्षणाची आणि अनुभवाची अधिकृत जाहिरातीतील पात्रता काय आहे हे माहिती करून अर्ज करणे महत्त्वाचे आहे.

वयोमर्यादा :

  • या भरतीमध्ये वयोमर्यादा पदानुसार बदलते.
  • मुख्य व्यवस्थापक पदांसाठी साधारणपणे 28 ते 40 वर्षे, तर काही IT Officer पदांसाठी वयोमर्यादा ही 42 वर्षांपर्यंत आहे.
  • वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी साधारणपणे 28 ते 37 वर्षे, तर व्यवस्थापक पदांसाठी बहुतेक पदांवर 25 ते 35 वर्षे अशी वयोमर्यादा आहे.
  • Officer पदांसाठी साधारणपणे 21 ते 30 वर्षे, Law Officer साठी 25 ते 30 वर्षे, Fire Officer साठी 21 ते 35 वर्षे, Security Officer साठी 25 ते 35 वर्षे, तर Civil Engineer पदासाठी 25 ते 30 वर्षे अशी वयोमर्यादा देण्यात आली आहे.
  • पदानुसार वयोमर्यादा हि वेगळी असल्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची अचूक वयोमर्यादा अधिकृत जाहिरातीत तपासावी.

वेतन:

BOI भरती 2026 मधील पदांनुसार वेतनश्रेणी देखील वेगवेगळी आहे.

  • Chief Manager: 1,02,300 ते 1,20,940 प्रतिमहिना
  • Senior Manager: 85,920 ते 1,05,280 प्रतिमहिना
  • Manager: 64,820 ते 93,960 प्रतिमहिना
  • Law Officer: 64,820 ते 93,960 प्रतिमहिना
  • Fire Officer: 64,820 ते 93,960 प्रतिमहिना
  • Security Officer: 64,820 ते 93,960 प्रतिमहिना
  • Officer: 48,480 ते 85,920 प्रतिमहिना
  • Civil Engineer: 48,480 ते 85,920 प्रतिमहिना

याशिवाय बँकेच्या नियमानुसार लागू असलेले इतर भत्ते आणि लाभ मिळू शकतात.

अर्ज शुल्क:

उमेदवारांनी अर्ज करताना प्रवर्गानुसार शुल्क भरावे लागणार आहे

SC/ST/PWD उमेदवारांसाठी: 175/– फक्त सूचना शुल्क

General/EWS/OBC उमेदवारांसाठी: 1,180/- अर्ज शुल्क + सूचना शुल्क

अर्ज शुल्क भरून ऑनलाइन पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करावी.

निवड प्रक्रिया:

या भरतीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि/किंवा वैयक्तिक मुलाखत या माध्यमातून केली जाऊ शकते. कोणत्या पदासाठी कोणती निवड प्रक्रिया लागू आहे, हे संबंधित पदाच्या अधिकृत जाहिरातीत तपासणे आवश्यक आहे.

काही तांत्रिक आणि वरिष्ठ पदांसाठी उमेदवाराचा शैक्षणिक अनुभव, संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आणि आवश्यक व्यावसायिक प्रमाणपत्रे महत्त्वाची ठरू शकतात.

म्हणून अर्ज केल्यानंतर फक्त परीक्षेची तयारी न करता, आपल्या पदासाठी मुलाखत किंवा इतर निवड टप्पा असल्यास त्याचीही तयारी करणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करायचा?

BOI भरती 2026 साठी अर्ज पद्धती ऑनलाइन आहे. उमेदवारांनी बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन संबंधित भरतीची जाहिरात पाहावी.

अर्ज करताना नाव, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, अनुभव, प्रमाणपत्रे आणि इतर लागणारी माहिती काळजीपूर्वक अचूक भरावी. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून लागू असलेले अर्जाचे शुल्क भरावे आणि अर्ज अंतिम स्वरूपात जमा करावा.

अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रत किंवा अर्ज क्रमांक भविष्यातील वापरासाठी जतन करून ठेवणे चांगले.

नोकरीचे ठिकाण:

या भरतीमधून निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात म्हणजेच पॅन इंडिया नोकरीची संधी मिळू शकते.

म्हणून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी देशातील इतर शहरांमध्ये किंवा राज्यांमध्ये काम करण्याची तयारी आहे का, याचाही विचार करावा.

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 सप्टेंबर 2026
  • मूळ अंतिम तारीख: 25 सप्टेंबर 2026
  • सुधारित अंतिम तारीख: 5 ऑक्टोबर 2026, रात्री 11:59 वाजेपर्यंत
  • त्यामुळे पात्र उमेदवारांनी वाढीव मुदतीचा फायदा घेऊन वेळेत अर्ज पूर्ण करावा.

महत्वाचे:

बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या आणि विशेषतः IT, इंजिनिअरिंग, माहिती सुरक्षा, कायदा आणि सुरक्षा क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी BOI भरती 2026 मध्ये विविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत.

या भरतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पदांची विविधता. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने केवळ एकूण 205 जागा पाहून अर्ज करण्याऐवजी आपली शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय आणि आवश्यक प्रमाणपत्रे कोणत्या पदाशी जुळतात, हे आधीs तपासावे.

अर्जाची अंतिम तारीख आता 5 ऑक्टोबर 2026 आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे सोयीचे ठरेल.

महत्त्वाची सूचना: भरतीतील पदनिहाय पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि इतर अटींसाठी बँक ऑफ इंडियाची अधिकृत जाहिरात अंतिम मानली जाईल. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट [ Official Website ]येथे क्लिक करा
जाहिरात PDFयेथे क्लिक करा

Website | + posts

प्रशांत हे Bhartipaper.com चे संस्थापक आणि लेखक आहेत. ते महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील सरकारी भरती, खासगी नोकऱ्या, अप्रेंटिसशिप आणि रोजगाराच्या संधींबाबत मराठी भाषेत माहिती प्रकाशित करतात.

भरतीविषयक लेख तयार करताना अधिकृत जाहिराती, संबंधित विभागांची संकेतस्थळे आणि अधिकृत सूचनांचा आधार घेऊन उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, रिक्त पदे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा यांची माहिती सोप्या व स्पष्ट मराठी भाषेत मिळावी, हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.

Leave a Comment