Konkan Railway Recruitment 2026 :रेल्वे विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची संधी आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सहाय्यक लोको पायलट आणि वरिष्ठ सहाय्यक लोको पायलट या पदांसाठी एकूण 66 रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करायचा आहे , ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने अश्या दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे.
रेल्वे क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या आणि संबंधित शैक्षणिक तसेच तांत्रिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक करिअर ची चांगली संधी आहे.विशेष म्हणजे या भरतीमध्ये विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना पदाच्या आवश्यकतेनुसार संधी मिळू शकते.
कोकण रेल्वे भरतीसाठी १९ ऑक्टोबर २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपर्यंत वाट न पाहता अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे आहे.
चला तर मग, कोकण रेल्वे भरती 2026 संदर्भातील पदे, जागांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची पद्धत आणि इतर महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊया.
कोकण रेल्वे भरती 2026 पद भरती:
Konkan Railway Recruitment 2026 :
या भरतीमध्ये 1. सहाय्यक लोको पायलट 2.वरिष्ठ सहाय्यक लोको पायलट या पदांचा भरती साठी समावेश आहे.
लोको पायलट हे रेल्वेच्या सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे या पदासाठी उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक तसेच तांत्रिक पात्रता असणे गरजेचे आहे.
पदाचे नाव आणि रिक्त जागा:
- पदाचे नाव – 1. सहाय्यक लोको पायलट 2.वरिष्ठ सहाय्यक लोको पायलट
- एकूण रिक्त पदे – 66 पदे
सरकारी आणि रेल्वे विभागात कोकण रेल्वे मध्ये भरती साठी ६६ जागा निघाल्या आहेत. सरकारी नोकरी किंवा रेल्वे मध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची संधी आहे. उमेदवारांनी नक्कीच या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊन अर्ज करण्यास काहीचं हरकत नाही तरी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी नक्की या भरतीचा विचार करावा.
शैक्षणिक पात्रता :
Kokan Railway Recruitment 2026 कोकण रेल्वे भरतीसाठी शैक्षणिक पात्रता
- या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार निश्चित करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार 10वी, 12वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवी यापैकी संबंधित पात्रता असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येऊ शकतो.
- मात्र येथे एक गोष्ट लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. फक्त 10वी, 12वी किंवा पदवी उत्तीर्ण असणे पुरेसे आहे असे उमेदवारांनी समजू नये. सहाय्यक लोको पायलट किंवा वरिष्ठ सहाय्यक लोको पायलट पदासाठी आवश्यक असलेली विशिष्ट तांत्रिक पात्रता आणि इतर अटी अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत.
- त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पूर्ण वाचावी आणि आपली पात्रता संबंधित पदासाठी लागू होते की नाही हे तपासावे आणि त्या नंतर या भरतीसाठी अर्ज करावा.
वयोमर्यादा:
कोकण रेल्वे भरती 2026 साठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आहे.
वयाची गणना अर्जाच्या तारखे पासून करण्यात येणार आहे. तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये काही सवलत ही आहे ,तुम्ही याच्या खात्री साठी अधिकृत वेबसाइट ही जाहिरात तपासू शकता आणि अधिकृत वेबसाईट वरील माहिती वाचणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रतेच्या निकषात आपण बसतो का, हे तपासाने महत्वाचे आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
Konkan Railway Recruitment 2026 : कोकण रेल्वे
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन (ई-मेल) आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वैयक्तिक माहिती तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती योग्य पद्धतीने नमूद करावी.
- ई-मेलद्वारे अर्ज पाठविण्यासाठी दिलेला ई-मेल पत्ता: spo.gnandeep@krcl.co.in
तसेच ऑफलाईन अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे ऑफलाईन पद्धतीने प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स तसेच भरलेल्या फॉर्म ची झेरॉक्स असा अर्ज अर्ज पुढील पत्त्यावर पाठवायचा आहे:
पत्ता: मुख्य अधिकारी कार्यालय,
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड,
चौथा मजला, बेलापूर भवन,
प्लॉट क्र. ६, सेक्टर-११, सी.बी.डी. बेलापूर,
नवी मुंबई – ४००६१४
अर्ज पाठवताना उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेल्या नियम व अटी नीट वाचून त्यात दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
अर्जाची शेवटची तारीख:
Konkan Railway Recruitment 2026 : कोकण रेल्वे
कोकण रेल्वे भरतीसाठी १९ ऑक्टोबर २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
उमेदवारांनी ही महत्त्वाची गोष्ट विशेषतः लक्षात ठेवावी अनेकदा काही उमेदवार शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे टाळतात आणि शेवटच्या दिवशी अर्ज करताना तांत्रिक अडचणी येऊ शकतात जसे की वेबसाईट वर एकदम ट्रॅफिक आल्याने वेबसाईट लॅक करू शकते किंवा इतर काही कागदपत्रांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात . त्यामुळे शक्य असल्यास अर्जाची प्रक्रिया आधीच पूर्ण करणे तुमच्या हिताचं ठरेल.
कोकण रेल्वे भरती 2026 संबंधित महत्त्वाची माहिती:
Konkan Railway Recruitment 2026 : कोकण रेल्वे अंतर्गत 66 पदांसाठी भरती:
- घटक – माहिती
- भरती विभाग – कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
- पदाचे नाव – 1. सहाय्यक लोको पायलट 2. वरिष्ठ सहाय्यक लोको पायलट
- एकूण पदे – 66 जागा
- शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार 10वी/12वी/ITI/डिप्लोमा/पदवी इ.
- कमाल वय – 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाईन
- ई-मेल – spo.gnandeep@krcl.co.in
- अंतिम तारीख – 19 ऑक्टोबर 2026
- अर्जाचा पत्ता – मुख्य कार्मिक अधिकारी, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, बेलापूर भवन, नवी मुंबई
- अधिकृत संकेतस्थळ – konkanrailway.com
उमेदवारांनी विशेषतः लक्ष देण्याचे मुद्दे:
भरतीची जाहिरात पाहिल्यानंतर लगेच अर्ज करण्यापेक्षा प्रथम आपली शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव आणि इतर आवश्यक अटी तपासणे गरजेचे आहे.
विशेषतः लोको पायलटशी संबंधित पदांसाठी तांत्रिक पात्रता महत्त्वाची असू शकते. त्यामुळे केवळ शैक्षणिक पात्रता पाहून अर्ज करू नये.
शैक्षणिक पात्रतेसोबतच तांत्रिक अनुभव असणे गरजेचे आहे.
तसेच अर्ज करताना नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती, संपर्क क्रमांक आणि इतर तपशील अचूक भरणे गरजेचे आहे. चुकीची माहिती दिल्यास पुढील प्रक्रियेत अडचण निर्माण होऊ शकते.
या भरतीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि/किंवा वैयक्तिक मुलाखत या माध्यमातून केली जाऊ शकते. कोणत्या पदासाठी कोणती निवड प्रक्रिया लागू आहे, हे संबंधित पदाच्या अधिकृत जाहिरातीत तपासणे आवश्यक आहे.
कोकण रेल्वेत नोकरीची संधी का महत्त्वाची?
रेल्वे विभागामध्ये नोकरी मिळवण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. यामागे सरकारी क्षेत्रातील नोकरी, कामाचे स्वरूप आणि करिअरच्या संधी यांसारखी विविध कारणे असतात.
कोकण रेल्वेच्या या भरतीमुळे संबंधित पात्रता असलेल्या उमेदवारांना रेल्वे क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विशेषतः सहाय्यक लोको पायलट किंवा वरिष्ठ सहाय्यक लोको पायलट या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करणाऱ्या उमेदवारांनी या भरतीकडे विशेषतः देणे आवश्यक आहे.
मात्र प्रत्येक उमेदवाराने स्वतःची पात्रता आणि अधिकृत जाहिरातीतील अटी तपासल्यानंतरच अर्ज करावा.
महत्त्वाचे…
तर मित्रांनो, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सहाय्यक लोको पायलट / वरिष्ठ सहाय्यक लोको पायलट पदाच्या एकूण 66 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 ऑक्टोबर 2026 आहे.
जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल, तर ही संधी दुर्लक्षित करू नका. अर्ज करण्यापूर्वी मात्र अधिकृत जाहिरात एकदा पूर्ण वाचणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण पदाची अचूक शैक्षणिक पात्रता, तांत्रिक अटी, अनुभव, निवड प्रक्रिया आणि इतर नियम इथे ही सोप्या भाषेत नमून केले आहेत तसेच अधिकृत जाहिरातीतही स्पष्ट केलेले आहेत.
भरतीची अधिकृत जाहिरात आणि अर्जासंबंधीची माहिती तपासूनच पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
अशाच नवीन सरकारी नोकरीच्या जाहिराती, रेल्वे भरती, महाराष्ट्रातील विविध विभागांमधील भरती आणि महत्त्वाच्या रोजगार अपडेट्ससाठी नियमितपणे भरती पेपर वर माहिती तपासत राहा.
महत्त्वाची सूचना: भरतीतील पदनिहाय पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि इतर अटींसाठी कोकण रेल्वेची अधिकृत जाहिरात अंतिम मानली जाईल. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
| अधिकृत वेबसाईट [ Official Website ] | येथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
प्रशांत हे Bhartipaper.com चे संस्थापक आणि लेखक आहेत. ते महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील सरकारी भरती, खासगी नोकऱ्या, अप्रेंटिसशिप आणि रोजगाराच्या संधींबाबत मराठी भाषेत माहिती प्रकाशित करतात.
भरतीविषयक लेख तयार करताना अधिकृत जाहिराती, संबंधित विभागांची संकेतस्थळे आणि अधिकृत सूचनांचा आधार घेऊन उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, रिक्त पदे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा यांची माहिती सोप्या व स्पष्ट मराठी भाषेत मिळावी, हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.