Naval Dockyard Mumbai Bharti 2026 : नोकरीसोबत प्रत्यक्ष तांत्रिक प्रशिक्षण घेण्याची संधी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी Naval Dockyard Mumbai Recruitment 2026 संदर्भातील नवीन अप्रेंटिस भरतीची माहिती महत्त्वाची आहे. Dockyard Apprentice School, Naval Dockyard Mumbai-400023 यांच्यामार्फत Apprenticeship Training in Designated Trades (IT-28) नुसार एकूण 283 प्रशिक्षणार्थी जागा उपलब्ध झाल्या आहेत. ही भरती विविध ITI ट्रेड सोबत 8वी आणि 10वी पास उमेदवारांसाठी उपलब्ध असलेल्या काही trades चा समावेश करते.
या भरतीचा जाहिरात क्रमांक DAS (MBI)/APP/IT-28 आहे. प्राप्त माहितीप्रमाणे अर्ज ऑनलाईन पद्धतीने असून अर्ज apprenticeshipregistration.com या पोर्टलद्वारे स्वीकारले जाणार आहेत. या भरतीमध्ये प्रगत मेकॅनिक (उपकरणे), संगणक ऑपरेटर व प्रोग्रामिंग असिस्टंट,फिटर, फाउंड्रीमॅन, आय अँड सीटीएसएम, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मशिनिस्ट, मरीन इंजिन फिटर, मेसन (गवंडी), सेंट्रल एसी प्लांट व औद्योगिक कूलिंग मेकॅनिक, एम्बेडेड सिस्टीम व PIC मेकॅनिक, मोटार वाहन मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक MTM, रेफ्रिजरेशन व एसी मेकॅनिक, प्रगत मशीन टूल ऑपरेटर, पेंटर, पॅटर्न मेकर, पाईप फिटर, प्रोग्रामिंग व सिस्टीम्स अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट, शीट मेटल वर्कर, शिपराइट स्टील, शिपराइट वुड (सुतार), TIG/MIG वेल्डर, वेल्डर, पाईप व प्रेशर व्हेसल्स वेल्डर, ओव्हरहेड क्रेन ऑपरेटर आणि रिगर.या जागा आहेत.
उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की ही apprenticeship training आहे. त्यामुळे याकडे थेट कायमस्वरूपी सरकारी पद म्हणून पाहू नये. प्रशिक्षण कालावधी आणि striped संबंधित trade प्रमाणे वेगळा आहे.
Naval Dockyard Mumbai मध्ये कोणत्या ट्रेडसाठी जागा आहेत?
या भरतीमध्ये 32 विविध designated trades मध्ये एकूण 283 जागा आहेत ट्रेड प्रमाणे रिक्त जागा खालीलप्रमाणे आहे:
| अ. क्र. | अप्रेंटिस ट्रेडचे नाव | जागा |
| १ | प्रगत मेकॅनिक – उपकरणे (Advance Mechanic – Instruments) | २ |
| २ | संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट – COPA (Computer Operator and Programming Assistant) | ६ |
| ३ | इलेक्ट्रीशियन (Electrician) | ३७ |
| ४ | इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (Electronics Mechanic) | २१ |
| ५ | फिटर (Fitter) | २१ |
| ६ | फाउंड्रीमॅन (Foundryman) | १ |
| ७ | आय अँड सीटीएसएम | ४ |
| ८ | उपकरणे तंत्रज्ञ (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) | २ |
| ९ | यंत्रसामग्री तंत्रज्ञ (मशिनिस्ट) | १० |
| १० | सागरी इंजिन फिटर | १७ |
| ११ | गवंडी | ३ |
| १२ | केंद्रीय वातानुकूलन व औद्योगिक शीतकरण यंत्रणा मेकॅनिक | १ |
| १३ | एम्बेडेड सिस्टीम व PIC तंत्रज्ञ | ५ |
| १४ | मोटार वाहन तंत्रज्ञ | २ |
| १५ | डिझेल मेकॅनिक (Mechanic Diesel) | २३ |
| १६ | इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | ८ |
| १७ | मेकॅनिक MTM | ११ |
| १८ | मेकॅट्रॉनिक्स मेकॅनिक (Mechanic Mechatronics) | ६ |
| १९ | रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक | ५ |
| २० | प्रगत मशीन टूल ऑपरेटर | २ |
| २१ | पॅटर्न मेकर (Pattern Maker) | १ |
| २२ | पाईप फिटर (Pipe Fitter) | ७ |
| २३ | प्रोग्रामिंग आणि सिस्टीम्स अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट | २ |
| २४ | शीट मेटल वर्कर (Sheet Metal Worker) | २ |
| २५ | शिपराइट – स्टील (Shipwright Steel) | ७ |
| २६ | शिपराइट – वुड / सुतार (Shipwright Wood) | २४ |
| २७ | TIG / MIG वेल्डर | ११ |
| २८ | वेल्डर (G&E) | १९ |
| २९ | पाईप व दाबपात्र वेल्डर | ९ |
| ३० | ओव्हरहेड क्रेन चालक | ३ |
| ३१ | रिगर / भारउचलणी सहाय्यक | ३ |
| ३२ | रंगकाम तंत्रज्ञ (पेंटर) | ८ |
| एकूण | एकूण जागा | २८३ |
नवल डॉकयार्ड मुंबई भरती 2026 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता प्रत्येक ट्रेडसाठी सारखी नसून या भरती मधील दोन ट्रेड साठी आयटीआय अनिवार्य नसून उर्वरित ट्रेडर्स साठी पात्रता आवश्यक आहे
Rigger:
या trade साठी उमेदवाराने 8वी पास असणे आणि 8वीमध्ये किमान 50% aggregate marks असणे गरजेचे आहे.
Crane Operator Overhead (SI):
या ट्रेड साठी 10वी पास आणि 10वीमध्ये किमान 50% गुण आवश्यक आहेत.
इतर निर्दिष्ट ट्रेड्स:
10वीमध्ये संबंधित विषयात किमान 50% गुण तसेच संबंधित ट्रेड मध्ये NCVT किंवा SCVT अंतर्गत ITI मध्ये किमान एकूण 50% गुण आवश्यक आहेत.ITI अभ्यासक्रमातील सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुण विचारात घेतले जातील.
उमेदवारांनी आपली आयटीआय ट्रेड आणि ज्या निश्चित ट्रेड साठी अर्ज करायचा आहे त्यातील पात्र trade mapping आधी तपासणे महत्त्वाचे आहे. चुकीच्या किंवा संबंधित नसलेल्या ITI trade वर अर्ज केल्यास उमेदवारी नाकारली जाऊ शकते.
या भरतीमध्ये वयोमर्यादेची 2026 जाहिरातीप्रमाणे शिकाऊ प्रशिक्षणासाठी वयाची मर्यादा नाही किमान वय ट्रेड च्या स्वरूपानुसार निश्चित केले आहे.
धोकादायक नसणारे ट्रेड साठी वय 14 वर्षे आहे, तर फाउंड्री मॅन, पॅटर्न मेकर वेल्डर, पाईप ऑपरेशन्स आणि पेंटर यांसारख्या धोकादायक ट्रेड्स (Hazardous Trades) साठी किमान वय 18 वर्षे आहे. वय आणि पात्रता ठरवण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही पात्रता ठरविण्यासाठी महत्त्वाची तारीख मानली जाईल.
जन्मतारखेचा पुरावा म्हणून सामान्यतः 10वी चे प्रमाणपत्र ग्राह्य धरला जातो. Rigger trade साठी इयत्ता 10वी प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास सक्षम प्राधिकारी कडून मिळालेला जन्म दाखाला विचारात घेतला जातो.
नेव्हल डॉकयार्ड मुंबई अप्रेंटिस स्टायपेंड
निवड झाल्यावर मिळणारे मानधन ट्रेड आणि शिकाऊ प्रशिक्षण कालावधी नुसार बदलते. उपलब्ध जाहिरातीनुसार बहुतेक ट्रेड साठी ₹9,600 प्रति महिना विद्यावेतन आहे.
Crane Operator Overhead (SI) साठी प्रशिक्षण कालावधी 15 महिने असून विद्यावेतन ₹8,200 प्रति महिना राहील. Rigger साठी training period दोन वर्षांचा असून stipend ₹6,800 प्रति महिना आहे. Shipwright Steel आणि Shipwright Wood यांसारख्या काही trades साठी प्रशिक्षण कालावधी 02 वर्षांचा आहे, तर अनेक ट्रेडसाठी तो एक वर्षाचा आहे. Pattern Maker साठी प्रशिक्षण कालावधी 18 महिने आहे.
अशा प्रकारे apprenticeship चा कालावधी पूर्णपणे एकसारखा नसल्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपल्या trade साठी लागू असणारा प्रशिक्षण कालावधी आणि stipend तपासणे आवश्यक आहे.
नेव्हल डॉकयार्ड मुंबई अप्रेंटिस भरती 2026 निवड प्रक्रिया
ही भरती केवळ अर्ज करून थेट apprenticeship सुरू होणारी प्रक्रिया नाही. उपलब्ध जाहिराती नुसार पात्र अर्जदारांची स्क्रीनिंग आणि निवड-सूची केली जाऊ शकते. अर्जांची संख्या उपलब्ध जागांच्या तुलनेत जास्त असल्यास निवड-सूची केली जाणार आहे.
निवड-सूची मध्ये 10वी आणि ITI मधील गुणाचा चा समान weightage वापरला जातो; Rigger आणि Crane Operator साठी संबंधित शैक्षणिक marks विचारात घेतले जातात.
निवड यादीत समाविष्ट उमेदवारांना लेखी परीक्षासाठी बोलावले जाईल परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकार आणि ओएमआर स्वरूपमध्ये असणार आहे. प्रश्नपत्रिका English आणि Hindi या भाषांमध्ये असल्याचे अधिसूचनामध्ये नमूद आहे.
लेखी परीक्षा मध्ये एकूण 100 प्रश्न आणि 100 गुण असतील. General Science, Mathematics आणि General Knowledge या विषयांचा समावेश असून परीक्षेसाठी 2 तासांचा कालावधी राहील Rigger trade साठी प्रश्नांचा स्तर 8वीच्या अभ्यासक्रमानुसार, तर इतर trades साठी 10वीच्या स्तरानुसार राहतो.
त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी पार पडते. त्यामुळे अर्जदारांनी शैक्षणिक व इतर आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित सांभाळून ठेवणे गरजेचे आहे.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी काय तपासले पाहिजे?
नेव्हल डॉकयार्ड मुंबई अप्रेंटिस भरती ऑनलाइन अर्ज करताना सर्वप्रथम आपला ट्रेड पात्र ते शी जुळतो काही पाहणे गरजेचे आहे. आयटीआय प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या प्रमाणपत्रावरील ट्रेड आणि अधिसूचनेमध्ये दिलेली पात्र ट्रेड यांची पडताळणी करावी.
फॉर्ममध्ये नाव, जन्मतारीख, शैक्षणिक गुण व इतर तपशील प्रमाणपत्राप्रमाणेच भरावे.
चुकीची माहिती दिल्यास कागदपत्रे पडताळणीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते.
पीडब्ल्यूडी आरक्षण ला घेणाऱ्या उमेदवारांकडे सक्षम प्राधिकारी कडून निर्धारित स्वरूपामध्ये दिव्यांगत्व प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. जाहिरातीमध्ये पीडब्ल्यूडी साठी 40% किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व संबंधित अट नमूद आहे.
तसेच या अगोदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पूर्ण केलेले किंवा संबंधित हे अप्रेंटीसशीप सुरू असलेली व्यक्ती पात्र आहे का, यासंबंधी जाहिरातीमध्ये दिलेली अट अर्ज करण्यापूर्वी तपासावी.
नेव्हल डॉकयार्ड मुंबई अप्रेंटिस भरती 2026 अर्ज कसा करावा?
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज या वेबसाईटवर करायचा आहे. Notification मध्ये application opening आणि closing date ठराविक कॅलेंडर तारखेऐवजी रोजगार बातमी मधील जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिवसावर आधारित दिल्या आहेत.
उपलब्ध रोजगार वृत्ताचे वेळापत्रक नुसार अधिसूचना 03 ते 09 ऑक्टोबर 2026 च्या अंकात प्रकाशित झाली असून.
नोंदणी ही जाहिरात प्रसिद्धीच्या पाचव्या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे त्यामुळे वेळापत्रकानुसार 07 ऑक्टोबर 2026 पासून ऑनलाइन नोंदणी सुरू होईल आणि अर्ज सुरू होण्याच्या तारखेपासून 21 व्या दिवशी रात्री 11:55 वाजता अर्जाची मुदत संपेल.
म्हणजेच शेवटची तारीख अर्ज करण्याआधी वेबसाईट किंवा जाहिराती मध्ये पुन्हा तपासावी.
अर्ज करताना उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची कॉपी किंवा आवश्यक नोंदणीची माहिती भविष्यातील प्रक्रियेसाठी सुरक्षित ठेवावी.
| येथे क्लिक करा | |
| ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
प्रशांत हे Bhartipaper.com चे संस्थापक आणि लेखक आहेत. ते महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील सरकारी भरती, खासगी नोकऱ्या, अप्रेंटिसशिप आणि रोजगाराच्या संधींबाबत मराठी भाषेत माहिती प्रकाशित करतात.
भरतीविषयक लेख तयार करताना अधिकृत जाहिराती, संबंधित विभागांची संकेतस्थळे आणि अधिकृत सूचनांचा आधार घेऊन उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, रिक्त पदे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा यांची माहिती सोप्या व स्पष्ट मराठी भाषेत मिळावी, हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.
