RRB Paramedical Bharti 2026 : भारतीय रेल्वे अंतर्गत 590 जागांसाठी नवीन भरती सुरू

RRB Paramedical Bharti 2026 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत 590 जागांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये नर्सिंग सुपरिटेंडंट, डायलिसिस टेक्निशियन, हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर (ग्रेड-II), ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, क्ष-किरण (X-ray) तंत्रज्ञ, ईसीजी (ECG) तंत्रज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट आणि लॅब असिस्टंट (ग्रेड-II) या 590 पदांसाठी RRB या विविध पदांची भरती केली जाणे जाणार आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ही 13 सप्टेंबर 2026 आहे. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या शेवटच्या तारखे अगोदर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. सदरील भरतीमध्ये उमेदवारांसाठी रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करून या भरतीचा पूर्णपणे लाभ घ्यावा.

महत्वाचे मुद्दे

  • भरती संस्था : भारतीय रेल्वे [RRB]
  • Ministry of Railways, Government of India
  • भरती : RRB Paramedical Recruitment 2026
  • एकूण जागा : 590 जागा
  • अर्जाची पद्धत : ऑनलाईन अर्ज पद्धत
  • परीक्षा पद्धती : परीक्षा पद्धती ऑनलाईन
  • परीक्षा ऑनलाईन संगणक आधारित असेल
  • अर्ज सुरू होण्याची तारीख| 15 सप्टेंबर 2026
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख| 14 ऑक्टोबर 2026

भरतीमध्ये उपलब्ध पदांची संख्या आणि त्याची नावे

भरतीमध्ये उपलब्ध पदांची संख्या आणि त्याची नावे
रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन25
नर्सिंग सुपरिटेंडेंट01
हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड II43
लॅब असिस्टंट ग्रेड II31
ऑप्टोमेट्रिस्ट02
फार्मासिस्ट118
ECG टेक्निशियन04
ऑडिओलॉजिस्ट अ‍ॅण्ड स्पीच थेरपिस्ट01
एकूण पदे590

दिलेल्या वरील पदांसाठी लागणारी आवश्यक शैक्षणीक पात्रता

या भरतीमध्ये प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आपल्या पदाची पात्रता तपासणे गरजेचे आहे.

पदांची नावेशैक्षणीक पात्रता
रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन1. 12वी उत्तीर्ण 2.Radiography / X Ray Technician / Radio diagnosis Technology या मध्ये डिप्लोमा आवश्यक
नर्सिंग सुपरिटेंडेंट जीएनएम किंवा बी.एस्सी. (नर्सिंग)
हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड IIबी.एस्सी. (रसायनशास्त्र) आणि हेल्थ/सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा किंवा एनटीसी (हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर) प्रमाणपत्र
लॅब असिस्टंट ग्रेड II1. 12वी उत्तीर्ण 2. DMLT
डायलिसिस टेक्निशियनB.Sc. (विज्ञान पदवी) आणि हेमोडायलिसिसमधील डिप्लोमा किंवा हेमोडायलिसिस क्षेत्रातील २ वर्षांचा अनुभव
ऑप्टोमेट्रिस्ट B.Sc. (Optometry) किंवा ऑप्थॅल्मिक टेक्निशियन डिप्लोमा
फार्मासिस्टबी.फार्म. (औषधनिर्माणशास्त्र)
ECG टेक्निशियन1. 12वी उत्तीर्ण /B.Sc  2. ECG Laboratory Technology / Cardiology /Cardiology Technician / Cardiology Techniques या विषयांमध्ये पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक
ऑडिओलॉजिस्ट अ‍ॅण्ड स्पीच थेरपिस्टऑडिओलॉजी, स्पीच-लँग्वेज पॅथॉलॉजीमधील पदवी (BASLP)

पदांसाठी आवश्यक वयाची अट

वयाची अट: ०१ जानेवारी २०२७ रोजी वयाची अट लागू असेल

पदांची नावेवयाची अट
रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियनवय 20 ते 40 वर्षे
नर्सिंग सुपरिटेंडेंटवय 18 वर्षे
हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड IIवय 18 ते 33 वर्षे
लॅब असिस्टंट ग्रेड II वय 18 ते 33 वर्षे
डायलिसिस टेक्निशियनवय 20 ते 33 वर्षे
ऑप्टोमेट्रिस्टवय 18 ते 33 वर्षे
फार्मासिस्ट वय 20 ते 35 वर्षे
ECG टेक्निशियनवय 18 ते 33 वर्षे
ऑडिओलॉजिस्ट अ‍ॅण्ड स्पीच थेरपिस्टवय 21 ते 30 वर्षे

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 33 आणि OBC प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 3 वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 पाच वर्ष वयोमर्यादेची सूट दिलेली आहे

निवड प्रक्रिया कशी असेल??

RBB Paramedical Recruitment मध्ये उमेदवाराची निवड प्रामुख्याने ऑनलाईन परीक्षा (CBT) आणि Document verification तसेच Medical Examination या टप्प्यावर केली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यावर CBT परीक्षा घेतली जाईल.
ऑनलाईन परीक्षेत जर तुम्ही पात्र ठरलात तर पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणी बोलावले जाऊ शकते.
अखेर संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार वैद्यकीय तपासणी केली जाईल.

CBT ऑनलाईन परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नसून , RRB कडून परीक्षे संबंधित माहिती अपडेटद्वारे कळवली जाईल.
उमेदवारांनी RRB च्या वेबसाईट वर संबंधित अपडेट साठी नियमित लक्ष ठेवणे आवश्यक आहे

वेतनश्रेणी

RRB Paramedical Bharti 2026 या भरती साठी जी 590 रिक्त पदांसाठी पे लेवल 3 ते पे लेवल 7 पर्यंतची वेतनश्रेणी लागू आहे.
अधिसूचने नुसार सुरुवातीचे वेतन 21,700/- ते 44,900/- दरम्यान असेल. आणि सरकारी नियमानुसार केंद्र सरकारच्या विविध भात्यांचा लाभ उमेदवारांना मिळूं शकतो.
रेल्वे भरती साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १५ सप्टेंबर २०२६ पासून ते १४ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे.
तरी इच्छुक उमदवारांनी शेवटच्या तारखेपर्यंतन थांबता RRB च्या अधिकृत पोर्टल वर जाऊन अर्ज करने आवश्यक आहे.

भरती पदे आणि रिक्त जागांसाठी मासिक वेतन

  • रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन – २९,२००/-
  • नर्सिंग सुपरिटेंडेंट – ४४,९००/-
  • हेल्थ अँड मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड II – ३५,४००/-
  • लॅब असिस्टंट ग्रेड II – २१,७००/-
  • डायलिसिस टेक्निशियन – ३५,४००/-
  • ऑप्टोमेट्रिस्ट – २५,५००/-
  • फार्मासिस्ट – २९,२००/-
  • ECG टेक्निशियन – २५,५००/-
  • ऑडिओलॉजिस्ट अ‍ॅण्ड स्पीच थेरपिस्ट – ३५,४००/-

या भरतीचे नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत हे आहे

या भरतीचे लागणारे आवश्यक शुल्क

रेल्वे बोर्ड च्या अधिकृत पोर्टल वर तपासावे परीक्षा शुल्काच्या रकमेत बदल असू शकतो.

भरती अर्ज करण्याची योग्य पद्धत

रेल्वे भरती बोर्डाच्या अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांना संगणक आधारित अर्ज पाठवायचे आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज च्या लिंकचा वापर करू शकतात.

किंवा खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता दिलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी आवश्यक संपूर्ण माहिती अर्जामध्ये नमूद करायची आहे.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑक्टोबर 2026

अर्ज कसा करावा

RRB Paramedical Recruitment २०२६ या वैद्यकीय विभागासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी खाली दिलेले मुद्दे लक्षात ठेवून अर्जाची प्रक्रिया करावी.

१. RRB च्या अधिकृत अर्ज पोर्टल ला भेट द्या.
2. CEN ०५/२०२६ Paramedical Recruitment निवडा.
3. आपण नविन उमेदवार असल्यास Registration पूर्ण करुन घ्या.
4. वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरा.
5. आपल्या पात्रतेनुसार योग्य पद निवडा.
6. आवश्यक ती कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी चा फोटो अपलोड करा.
7. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
8. सर्व माहिती एकदा तपासून अर्ज अंतिम स्वरूपात Submit करा.
9. अर्जाची PDF/ Printout भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवा.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेशी संबंधित सर्व अटी तपासणे आवश्यक आहे. अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज/ उमेदवारी रद्द होऊ शकते

उमेदवारांनी विशेषतः लक्षात ठेवावं

भरतीसाठी अर्ज करताना केवळ RRB च्या अधिकृत पोर्टल वरून अर्ज करावा.
उमेदवारांनी CEN ०५/२०२६ ची संपूर्ण अधिसूचना वाचून आपली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वैद्यकीय मानक, आरक्षण, परीक्षा पद्धती आणि RRB/ Zone- wise vacancy तपासावी.

भरती संबंधित कोणत्याही अपडेट साठी RRB च्या अधिकृत वेबसाइटवरच अवलंबून राहावे .
भारतीय रेल्वेतील पॅरामेडिकल क्षेत्रातील ५९० पदाची RRB Paramedical Recruitment २०२६ भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

Nursing Superintendent, Pharmacist, Health and Malaria Inspector, Laboratory assistant, Radiology,ECG technician, Dialysis Technician, Optometrist आणि Audiologist and Speech Therapist
अशा विविध पदाचा या भरतीमध्ये समावेश आहे.

पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर २०२६ आहे.
तर संबंधित शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता अधिसूचना काळजीपूर्वक वाचून वेळेत अर्ज पूर्ण करावा.

महत्वाची टीप : भारतातील रिक्त पदे आणि इतर तपशील RRB च्या अधिसूचनेनुसार आहेत, अर्ज करण्यापूर्वी RRB च्या अधिकृत पोर्टलवरील नवीत्तम अपडेट होणाऱ्या सूचना तपासणे आवश्यक आहे.

वरील भरतीसाठी आवश्यक लिंक

अधिकृत जाहिरात PDFअधिकृत जाहिरात बघा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंकअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment