Maharashtra kisan mitra bharti: 2026 ड्रोन ऑपरेट आणि किसान मित्र अशा 2 पदासाठी ही मोठी भरती निघालेली आहे .सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व कृषी क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आणि महिलांसाठी एक खूशखबर आहे. सांगली सोलापूर कृषी विस्तार क्लस्टर प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत १,१११ रिक्त पदांची एक मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत किसान मित्र आणि ड्रोन ऑपरेटर या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरती साठी कृषी क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचे असणार आहे . शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण असली तरी कृषी क्षेत्रातील ज्ञान असेन या पदासाठी फायद्याचे ठरेल. सोलापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये ही भरती निघाली असून या भरतीतील एक पद महिलांसाठी राखीव आहे जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटानुसार प्रत्येक गटा मध्ये 3 महिलांची नियुक्ती केली जाणार आहे.
सांगली सोलापूर कृषी विस्तार क्लस्टर भरती २०२६ –
मुख्य ठळक मुद्दे:
पदांचे नावं,एकूण जागा, नोकरीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता,अर्जाची पद्धत अर्जाची शेवटी तारीख या भरती संबंधित सगळ्या महत्वाच्या बाबी अगदी सोप्या मध्ये आणि महत्वाचे मुद्दे तुमच्या लक्षात राहतील अशा पद्धतीने पुढे मांडलेले आहेत. अर्ज करण्यापूर्वी हे ठळक मुद्दे उमेदवारांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे .
| बाबी | सविस्तर माहिती |
| कंपनी / संस्थेचे नाव | सांगली सोलापूर कृषी विस्तार क्लस्टर प्रायव्हेट लिमिटेड |
| पदांचे नाव | १. किसान मित्र (पुरुष / महिला) २. ड्रोन ऑपरेटर (केवळ महिलांसाठी) |
| एकूण रिक्त पदे | १,१११ पदे |
| नोकरीचे ठिकाण | सांगली आणि सोलापूर जिल्हा |
| शैक्षणिक पात्रता | १२ वी पास |
| अर्जाची पद्धत | ऑनलाईन (Online) |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | ३ ऑक्टोबर २०२६ |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३० ऑक्टोबर २०२६ |
| अधिकृत संकेतस्थळ | sangli-solapur.krishivistar.com |
भरतीची प्रक्रिया ऑनलाइन असून निवड प्रक्रियेत लेखी परीक्षेचा समावेश आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाने 3 ऑक्टोबर 2026 रोजी भरतीची माहिती प्रसिद्ध केली असून अर्जाची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2026 आहे.
पदनिहाय रिक्त जागांचा तपशील:
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १,१११ जागा भरल्या जाणार आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आवश्यकतेनुसार पदांची विभागणी करण्यात आली आहे:
किसान मित्र या पदासाठी सांगली जिल्ह्यात ३६६ तसेच सोलापूर जिल्ह्यात ४०८ जागा तालुक्या नुसार विभागल्या आहेत. सांगली जिल्ह्यात १० तालुके आहेत त्यात ६१ जिल्हापरिषद गट आहेत. आणि सोलापुर जिल्ह्यात ११ तालुके आहेत तर ६८ जिल्हा परिषद गट आहेत या आवडल्या नुसार पदे जिल्ह्यामध्ये विभागली गेली आहेत.
तर ड्रोन ऑपरेट या पदासाठी सांगली आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यामध्ये मिळून एकूण ३३७ अशी पदे आहेत.
ही पदे १२९ जिल्हा परिषद गटामध्ये विभागलेली आहेत.
ड्रोन ऑपरेट हे पद खास महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
१. किसान मित्र (Kisan Mitra – Male/Female)
- सांगली जिल्हा: (१० तालुके – ६१ जिल्हा परिषद गट): ३६६ पदे
- तालुकानिहाय विस्तार: आटपाडी (४), जत (९), खानापूर (४), कडेगाव (४), तासगाव (६), कडेठेवणांकाळ (४), पलूस (४), वाळवा (११), शिराळा (४), मिरज (११).
- सोलापूर जिल्हा : (११ तालुके – ६८ जिल्हा परिषद गट): ४०८ पदे
- तालुकानिहाय विस्तार: करमाळा (६), माढा (७), बार्शी (७), उत्तर सोलापूर (६), मोहळ (५), पंढरपूर (८), माळशिरस (९), सांगोला (६), मंगळवेढा (४), दक्षिण सोलापूर (६), अक्कलकोट (६).
२. ड्रोन ऑपरेटर (Drone Operator – Only Female)
- सांगली आणि सोलापूर जिल्हा (एकूण १२९ जिल्हा परिषद गट): ३३७ पदे
- हे पद विशेषतः महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले असून प्रत्येक जिल्हा परिषद गटात ३ महिला उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.
पात्रता आणि आवश्यक अटी: (Eligibility Criteria)
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे आवश्यक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त मंडळातून उमेदवाराने १२ वी (HSC) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- स्मार्टफोन व इंटरनेट: उमेदवाराकडे स्वतःचा अँड्रॉइड / स्मार्ट फोन आणि त्यात सुरु असलेले इंटरनेट असणे अनिवार्य आहे.
- वाहन आणि परवाना: स्वतःची दुचाकी (Two-Wheeler) असणे आवश्यक आहे.
- स्थानिक रहिवासी: उमेदवार संबंधित क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असावा.
- शेतीचे ज्ञान: उमेदवारास शेतीविषयक माहिती, खते, कीटकनाशके, बियाणे व कृषी औषधांबद्दल पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे.
- कामाचे स्वरूप व कालावधी: हे काम कमिशन बेसिसवर स्वरूपाचे असून किमान १ ते २ वर्षे सातत्याने काम करण्याची उमेदवाराची तयारी असावी.
कोणाला प्राधान्य दिले जाईल? - एलआयसी (LIC), विमा क्षेत्र किंवा पूर्वतयारी म्हणून कृषी मित्राचे काम केलेल्या उमेदवारांना.
- कृषी क्षेत्रातील पूर्वीचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना निवडीत प्राधान्य दिले जाईल.
काम आणि जबाबदाऱ्या:(Job Responsibilities)
किसान मित्र (Kisan Mitra): स्थानिक शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधून त्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, योग्य खते, औषधे आणि बी-बियाण्यांबद्दल मार्गदर्शन करणे. तसेच कंपनीच्या विविध कृषी सेवा व उत्पादने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे.
ड्रोन ऑपरेटर (Drone Operator): शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोनद्वारे औषध फवारणी व पाहणी कामात सहभाग घेणे. महिलांना कृषी तंत्रज्ञानात सक्षम बनवण्यासाठी या पदाची निर्मिती करण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया: (Selection Process)
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
ऑनलाईन अर्ज केल्या नंतर तुमच्या अर्जाची दखल घेऊन अर्जाची निवडलेली जाईल आणि उमेदवारांना मुलाखती साठी बोलावले जाईल, त्यामुळे संपर्काची सर्व माहिती अचूक भरावी. त्यानंतर मुलाखती द्वारा उमेदवारांची निवड केली जाईल . महत्वाचे म्हणजे मुलाखती नंतर निवड झालेल्या उमेदवारांसाठी पहिला काही वेळ हा ट्रेनिंग पिरियड मध्ये जाईल त्या मुळे ट्रेनिंग पिरियड असल्याने या क्षेत्रा बद्दल काही माहिती नसेल तरी ही तुम्ही जर शिकण्यास इच्छुक असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.
- अर्जांची छाननी: प्राप्त झालेल्या ऑनलाईन अर्जांची तपासणी केली जाईल.
- चाचणी / मुलाखत (Test and/or Interview): पात्र उमेदवारांची संगणकीय चाचणी किंवा थेट मुलाखत घेतली जाईल.
- प्रशिक्षण: निवड झालेल्या उमेदवारांना कामाचे स्वरूप व तंत्रज्ञानाविषयी आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल.
ऑनलाईन अर्ज कसा करावा? (Step-by-Step Application Process)
इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील पायऱ्यांचे अनुसरण करून ऑनलाईन अर्ज सादर करावा:
- सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळास (sangli-solapur.krishivistar.com) भेट द्या.
- होमपेजवर उपलब्ध असलेल्या ‘Apply Online’ किंवा भरतीच्या लिंकवर क्लिक करा.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक, शैक्षणिक व संपर्काची माहिती अचूक भरा.
- तुमची शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर आवश्यक तपशील जोडा.
- सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या आणि अर्ज Submit करा.
- अर्जाची एक प्रत भविष्यातील संदर्भासाठी डाऊनलोड करून ठेवा.
महत्त्वाच्या तारखा आणि संपर्क माहिती - अर्ज सुरू होण्याची तारीख: ३ ऑक्टोबर २०२६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० ऑक्टोबर २०२६
अर्ज करताना खाली दिलेले मुद्दे लक्षात घ्या. अर्जाची पद्धत ही ऑनलाईन आहे त्यामुळे सर्व माहिती अचूक भरा तसेच १२ वी उत्तीर्ण ही या पदाची पात्रता असल्याने , १०वी,१२ वी ची गुणपत्रिका सोबत आधारकार्ड आणि जे काही इतर आवश्यक कागदपत्रे असतील ती ऑनलाईन फ्रॉम मध्ये अपलोड करा. अर्जाची एक प्रत तुमच्या जवळ ठेवणे ही गरजेचे आहे .
अर्जाची शेवटची तारीख ही ३० ऑक्टोबर २०२६ ही आहे.
तरी शेवटच्या तारखे आधी अर्ज करणे योग्य राहील.
निष्कर्ष
सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील १२ वी पास तरुण-तरुणींसाठी, विशेषतः महिलांसाठी ही एक उत्तम रोजगाराची संधी आहे. कृषी क्षेत्रातील माहिती असणाऱ्या , स्मार्टफोन आणि स्वतःच वाहन असेल तर तुम्ही योग्य उमेदवार आहात या पदासाठी. तसेच उमेदवारांनी अर्ज करण्या पूर्वी एकदा अधिकृत वेबसाईट वर जाऊन संपूर्ण माहिती वाचणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि स्थानिक स्तरावर काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ३० ऑक्टोबर २०२६ पूर्वी आपला ऑनलाईन अर्ज नक्की भरावा.
| अधिकृत वेबसाईट [ Official Website ] | येथे क्लिक करा |
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| वय तपासा | येथे क्लिक करा |
या भरतीमध्ये कोणकोणती पदे उपलब्ध आहेत?
या भरतीद्वारे खालील दोन पदे भरली जाणार आहेत:
किसान मित्र (Kisan Mitra): पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी.
ड्रोन ऑपरेटर (Drone Operator): केवळ महिला उमेदवारांसाठी.
एकूण किती रिक्त जागा उपलब्ध आहेत?
एकूण १,१११ पदे उपलब्ध आहेत:
किसान मित्र (सांगली जिल्हा): ३६६ पदे
किसान मित्र (सोलापूर जिल्हा): ४०८ पदे
ड्रोन ऑपरेटर (महिला – दोन्ही जिल्हे): ३३७ पदे
शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे?
उमेदवार १२ वी (HSC) पास असणे आवश्यक आहे.
अर्जासाठी इतर कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
इंटरनेट व स्मार्टफोन: उमेदवाराकडे स्वतःचा अँड्रॉइड/स्मार्टफोन असणे अनिवार्य आहे.
दुचाकी: स्वतःचे दुचाकी वाहन (Two-Wheeler) असणे आवश्यक आहे.
माहिती व अनुभव: शेती, खते, कीटकनाशके आणि बियाण्यांची पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराची १ ते २ वर्षे काम करण्याची तयारी असावी.
या नोकरीसाठी प्राधान्य कोणाला दिले जाईल?
कृषी क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना.
एलआयसी (LIC), विमा क्षेत्रात काम केलेल्या किंवा पूर्वी ‘किसान मित्र’ (KM) म्हणून काम केलेल्या उमेदवारांना निवडीत प्राधान्य दिले जाईल.
नोकरीचे स्वरूप आणि वेतन कसे असेल?
हे काम कमिशन बेसिसवर (Commission Basis) राहणार आहे.
नोकरीचे ठिकाण कोणते आहे?
नोकरीचे ठिकाण सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुके आणि जिल्हा परिषद गट हेच असणार आहे.
अर्ज कसा आणि कुठे करावा?
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: sangli-solapur.krishivistar.com
प्रशांत हे Bhartipaper.com चे संस्थापक आणि लेखक आहेत. ते महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील सरकारी भरती, खासगी नोकऱ्या, अप्रेंटिसशिप आणि रोजगाराच्या संधींबाबत मराठी भाषेत माहिती प्रकाशित करतात.
भरतीविषयक लेख तयार करताना अधिकृत जाहिराती, संबंधित विभागांची संकेतस्थळे आणि अधिकृत सूचनांचा आधार घेऊन उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, रिक्त पदे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा यांची माहिती सोप्या व स्पष्ट मराठी भाषेत मिळावी, हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.