Indian Coast Guard Bharti 2026: भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी नोकरीची संधी!!

Indian Coast Guard Bharti 2026 : भारतीय तटरक्षक दल म्हणजेच Indian coast guard (ICG) यांच्या अंतर्गत विविध गट- क नागरी पदांसाठी भरती 2026 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, या भरतीमध्ये स्टोअर कीपर ग्रेड II, इंजिन ड्रायव्हर, लास्कर, सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, MTS (चौकीदार) MTS (शिपाई) अशा विविध पदांच्या 06 जागा उपलब्ध आहे.

या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यानुसार तयार करून संबंधित कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2026 आहे.

भारतीय तटरक्षक दलामध्ये पदावर नोकरीची संधी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे या भरतीमध्ये अर्ज करण्याआधी शैक्षणिक पात्रता अनुभव वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची पद्धत काळजीपूर्वक तपासून अर्ज करावा.

भरती विषयी थोडक्यात

जाहिरात क्र.: CGRHQ(WEST)/01/2026
भरती संस्था: Indian Coast Guard
एकूण रिक्त जागा: 06
पदांचा प्रकार: विविध नागरी पदे
अर्जाची पद्धत: ऑफलाईन
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पाठविण्याचे माध्यम: पोस्टाद्वारे
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख: 03 नोव्हेंबर 2026

पदानुसार रिक्त जागा

पदांचे नाव पदांची संख्या
लास्कर01
स्टोअर कीपर ग्रेड II01
इंजिन ड्रायव्हर01
सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर01
MTS (चौकीदार)01
MTS (शिपाई)01
एकूण06

आवश्यक शैक्षणिक पात्रता

इंडियन कोस्ट गार्ड भरती मधील पदांसाठी पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे काही पदांची 10वी पास तर काही पदांसाठी 12वी पास असणे आवश्यक आहे. आणि संबंधित कामाचा अनुभव किंवा आवश्यक प्रमाणपत्र देखील लागणार आहे.

स्टोर कीपर ग्रेड II

  • या पदासाठी उमेदवार बारावी पास असणे आवश्यक आहे व 01 वर्षाचा संबंधित अनुभव आवश्यक आहे. म्हणून बारावी उत्तीर्ण असणे पुरेसे नसून संबंधित अनुभव पूर्ण असणे गरजेचे आहे.

इंजिन ड्रायव्हर

  • या पदासाठी उमेदवार दहावी पास असा सभा तसेच उमेदवाराकडे इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित प्रमाणपत्र आहे आणि जाहिरातीत दिलेल्या इतर अटी पूर्ण होतात ते या पदासाठी अर्ज करू शकतात.

लास्कर

  • या पदासाठी उमेदवार 10वी पास असावा आणि 03 वर्षांचा संबंधित अनुभव असावा. त्यामुळे या पदासाठी अर्ज करण्याआधी संबंधित वैद्य पुरावा उपलब्ध आहे हे उमेदवारांनी तपासावे.

सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर

  • या पदासाठी उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराकडे अवजड आणि हलके वाहन चालक परवाना असणे देखील गरजेचे आहे. सोबतच या पदासाठी 02 वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक आहे.

MTS (शिपाई)

  • या पदासाठी उमेदवार दहावी पास असावा आणि कार्यालयीन मदतनीस म्हणून 02 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

MTS (चौकीदार)

या पदासाठी उमेदवार 10वी पास असणे गरजेचे आहे व सोबतच चौकीदार म्हणून दोन वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

या भरतीमध्ये वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी निश्चित केली गेली आहे.

स्टोअर कीपर ग्रेड II : 18 ते 25 वर्षे
इंजिन ड्रायव्हर: 18 ते 30 वर्षे
लास्कर: 18 ते 30 वर्षे
सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर: 18 ते 27 वर्षे
MTS (शिपाई): 18 ते 27 वर्षे
MTS (चौकीदार) : 18 ते 27 वर्षे

आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना तसेच इतर पात्र उमेदवारांना लागू असलेल्या सरकारी नियमाप्रमाणे वयोमर्यादेमध्ये सवलत मिळू शकते त्याकरिता उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात नियम पहावे.

नोकरीचे ठिकाण

या भरतीतील पदांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

अर्जाचे शुल्क

प्रसिद्ध जाहिरातीनुसार अर्ज शुल्काबाबतचे स्वतंत्र रक्कम दिलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर संबंधित अधिकृत जाहिरातीत शुल्काबाबत सूचना काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज पद्धत

इंडियन कोस्ट गार्ड भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याऐवजी जाहिराती दिलेल्या पद्धतीनुसार अर्ज तयार करून पोस्टामार्फत पाठवायचा आहे.

अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती अचूक भरावी. अर्जामध्ये उमेदवाराचे नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता,जन्मतारीख, अनुभव आणि इतर आवश्यक माहिती भरताना कोणतीही चूक करू नये.

अर्जासोबत लागणारे शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभवाची कागदपत्र आणि पदासाठी आवश्यक इतर कागदपत्रांच्या प्रती, जाहिरातीत नमूद केल्या त गेलेल्या सूचनानुसार जोडा.

अर्ज दिलेल्या खालील पत्त्यावर पाठवायचा आहे उमेदवारांनी अर्ज तीन नोव्हेंबर 2026 पर्यंत दिलेल्या कार्यालयात पोहोचेल अशा पद्धतीने पाठवावे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :

Headquarters Coast Guard Region (West)
Alexander Graham Bell Road
PO Malabar Hill
Mumbai – 400006

अर्ज करण्याआधी लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी

इंडियन कोस्ट गार्ड भरती मधील पदांची संख्या कमी असून प्रत्येक पदासाठी केवळ 01 जागा आहे त्यामुळे अर्जदारांनी आपली पात्रता जाहिरातीशीच होते का हे सर्वप्रथम बघावे.

विशेषतः अनुभवाची अट असलेल्या पदांकरिता अनुभवाचा पुरावा असणे महत्त्वाचा आहे.
ड्रायव्हर पदासाठी आवश्यक वाहन परवाना बरोबर आहे का इंजिन ड्रायव्हर पदासाठी आवश्यक प्रमाणपत्र आणि स्टोर कीपर लास्कर MTS पदांसाठी मागितलेला संबंधित अनुभव आहे का याची खात्री करूनच अर्ज करावा.

ऑफलाइन अर्ज पद्धत असल्यामुळे अर्ज पाठविण्यास शेवटच्या दिवसाची वाट न बघता तो वेळेत लवकरात लवकर योग्य ठरेल अशा वेळेत पोस्टाने पाठवावा आणि त्याची प्रत पोस्टाशी संबंधित पुरावा स्वतःकडे सुरक्षित ठेवावी.

अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्याची आणि कागदपत्रांचे व इतर सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

ही भरती ऑफलाइन प्रक्रियेद्वारे होत असल्यामुळे अर्ज करताना प्रत्येक माहिती स्पष्ट व अचूक लिहिणे महत्त्वाचे आहे. अर्जामध्ये चुकीची माहिती किंवा अपूर्ण अर्ज असल्यास अर्ज रद्द केल्या जाऊ शकतो त्यामुळे अर्ज पाठवण्या अगोदर संपूर्ण अर्ज पुन्हा तपासावा.

इतर सूचना

भारतीय तटरक्षक दलाच्या सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे या संधीमध्ये पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज अंतिम तारखेच्या आधी पाठवावा.

इंडियन कोस्टकार्ड भरती 2026 मध्ये एकूण 06 पदांसाठी भरती होत असून दहावी आणि बारावी पास उमेदवारांकरिता चांगली संधी उपलब्ध आहे मात्र या भरतीतील अनेक पदांची शैक्षणिक पात्रते सोबतच संबंधित कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

त्यामुळे अर्ज करण्याआधी उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता अनुभव वय आणि इतर आवश्यक असलेल्या अटी काळजीपूर्वक तपासावे पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच अर्जाचा नमुना योग्यरीत्या भरावा आणि सर्व आवश्यक असलेले कागदपत्र अर्ज सोबत दिलेल्या संबंधित पत्त्यावर वेळेत पाठवावे.

ऑफलाईन अर्ज पोहोचवण्यासाठी अंतिम तारीख 03 नोव्हेंबर 2024 दिलेली आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

भारतीय तटरक्षक दलातील या भरतीमध्ये विविध पदांचा समावेश असल्याने उमेदवारांना त्यांच्या कौशल्य आणि अनुभवाला योग्य पदासाठी अर्ज करण्याची संधी मिळते.

प्रत्येक पदाच्या जबाबदाऱ्या या वेगवेगळ्या असून त्याप्रमाणे कामाचे स्वरूप बदलते भरती संबंधित कोणताही निर्णय घेण्याआधी अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेली संपूर्ण सूचना वाचणे महत्त्वाचे आहे.

पदाचे स्वरूप सेवा अटी आणि संबंधित नियम समजून घेतल्यास अर्ज प्रक्रिया स्पष्टपणे करता येते.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातच्या समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून PDF जाहिरात बघावी.

भरतीची माहिती कुठे तपासावी?


भरतीची संबंधित बदल, पुढील सूचना, अर्ज संदर्भातील स्पष्टीकरण इंडियन कोस्ट गार्डच्या अधिकृत वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यावी.

भरतीची पीडीएफ जाहिरात ही प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची संदर्भ आहे उमेदवारांनी वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या अधिकृत सूचनांची पाहणी करून परदेशी संबंधित नवीन अपडेट लक्षात घ्यावे.

अनधिकृत सोशल मीडिया पोस्ट, अपूर्ण जाहिरात किंवा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करून अधिकृत स्त्रोतांवर आधारित असलेल्या माहितीचा वापर करावा.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
[ अधिकृत वेबसाईट ]येथे क्लिक करा
Website | + posts

प्रशांत हे Bhartipaper.com चे संस्थापक आणि लेखक आहेत. ते महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील सरकारी भरती, खासगी नोकऱ्या, अप्रेंटिसशिप आणि रोजगाराच्या संधींबाबत मराठी भाषेत माहिती प्रकाशित करतात.

भरतीविषयक लेख तयार करताना अधिकृत जाहिराती, संबंधित विभागांची संकेतस्थळे आणि अधिकृत सूचनांचा आधार घेऊन उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, रिक्त पदे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा यांची माहिती सोप्या व स्पष्ट मराठी भाषेत मिळावी, हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.

Leave a Comment