UIIC Bharti 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स मध्ये 225 पदाकरिता उमेदवारांना नोकरीची संधी

UIIC Bharti 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. यांनी प्रशासकीय अधिकारी स्केल १ सामान्य श्रेणी व हिंदी अधिकारी या पदांसाठी भरती करिता एकूण 225 जागांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित केली आहे.पदांसाठी पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे सदरील भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 08 सप्टेंबर 2026 या तारखेपासून झाली आहे, तसेच ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2026 आहे.

सदर भरतीसाठी लागणारी संपूर्ण आवश्यक माहिती खाली दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी भरती अर्ज करण्या अगोदर दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे वाचून शैक्षणिक पात्रता पडताळून या भरतीसाठी अर्ज करावा.या भरतीविषयीची सर्व महत्त्वाची माहिती शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया,वयोमर्यादा, मिळणारे वेतन आणि अर्ज कसा करावा याबद्दल अगदी सोप्या आणि सविस्तर मराठीत जाणून घेऊया.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स भरती महत्त्वाचे मुद्दे

  • भरती संस्था: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि (UIIC)
  • पदांची नावे : प्रशासकीय अधिकारी (स्केल-I) – सामान्य श्रेणी व हिंदी अधिकारी
  • एकूण रिक्त पदे : 225 जागा
  • नोकरीचा विभाग : सरकारी क्षेत्र (Public Sector Insurance Company)
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता खाली दिलेली आहे
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या नुसार)
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत महाराष्ट्र करिता – UIIC च्या मागील AO भरतींमध्ये पुणे, मुंबई/नवी मुंबई/ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, नांदेड, सातारा, सांगली, रत्नागिरी, चंद्रपूर, सोलापूर, लातूर आणि धुळे यांसारखी ठिकाणे सूचीत होती. मात्र 2026 च्या या भरतीत अंतिम पोस्टिंग नियुक्ती झालटक कंपनीच्या निर्णयावर अवलंबून असेल.
  • अधिकृत वेबसाईट : https://uiic.co.in/

युनायटेड इंडिया इन्शुरन्स भरती शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक अनुभव

Generalists (जनरलिस्ट)

  • उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी/पदव्युत्तर पदवी असावी त्यामध्ये अभियांत्रिकी, कला, विज्ञान, वाणिज्य, डेटा सायन्स इत्यादी शाखांचा समावेश आहे. पदवी परीक्षेत किमान 60%. गुण सर्वसामान्य प्रवर्गासाठी इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 55% गुण आवश्यक आहे.

Hindi Officers (हिंदी अधिकारी)

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातील हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी, त्यामध्ये इंग्रजी हा अनिवार्य/ऐच्छिक विषय किंवा पदवी परीक्षेचे माध्यम असावे.
  • किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठातून इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी त्यामध्ये हिंदी हा अनिवार्य /ऐच्छिक विषय किंवा पदवी परीक्षेच्या माध्यम असावे.
  • किंवा हिंदी व इंग्रजी व्यतिरिक्त कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी, ज्यामध्ये हिंदी व इंग्रजी हे दोन्ही अनिवार्य ऐच्छिक विषय किंवा पदवी परीक्षेचे माध्यम असणे आवश्यक आहे.

सर्व वरील पर्यायांसाठी किमान सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना किमान 60% गुण आवश्यक आहेत. SC/ST/PwBD उमेदवारांना किमान 55% गुण आवश्यक आहेत.

या भरतीच्या प्रशासकीय अधिकारी पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या आवश्यकतेप्रमाणे अंतिम करण्यात आली आहे.उमेदवारांनी संबंधित पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, पदवी, विषय आणि इतर आवश्यक अटी जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि भरती अर्ज शुल्क

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग उमेदवार आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे कायमस्वरूपी कर्मचारी वगळता इतर सर्व उमेदवार – ₹1,000 + लागू वस्तू व सेवा कर

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग उमेदवार आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे कायमस्वरूपी कर्मचारी ₹250 + लागू वस्तू व सेवा कर

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग उमेदवार आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसाठी अर्ज शुल्क नाही. त्यांना फक्त ₹250 सेवा शुल्क भरावे लागणार आहे. त्यावर लागू वस्तू व सेवा कर अतिरिक्त असेल.

भरतीसाठी उपलब्ध जागा तसेच पदांची माहिती

पदांची माहिती प्रवर्गानुसार

प्रशासकीय अधिकारी (स्केल-I) – सामान्य श्रेणी 200 जागा

Administrative Officer – Generalists पदांची माहिती

प्रवर्गपदांची संख्या
अनुसूचित जमाती (ST)18
अनुसूचित जाती (SC)30
इतर मागासवर्गीय (OBC)62
आर्थिक दुर्बल घटक (EWS)22
खुला प्रवर्ग (UR)68
एकूण200

दिव्यांगांसाठी आरक्षण

  • दृष्टीदोष असलेले उमेदवार – 2
  • श्रवणदोष असलेले उमेदवार – 2
  • अस्थिव्यंग असलेले उमेदवार – 4
  • बहुविकलांगता / बौद्धिक अपंगत्व – 3

Administrative Officer – Hindi Officers पदांची माहिती

प्रशासकीय अधिकारी (स्केल-I) – हिंदी अधिकारी 25 जागा

प्रवर्गपदांची संख्या
अनुसूचित जाती (SC)04
अनुसूचित जमाती (ST)01
इतर मागासवर्गीय (OBC)07
आर्थिक दुर्बल घटक (EWS)02
खुला प्रवर्ग (UR)11
एकूण25

दिव्यांगांसाठी आरक्षण

  • दृष्टीदोष असलेले उमेदवार – 1

वयाची अट

उमेदवाराचे वय 21 ते 28 वर्षे असावे.
प्रवर्गानुसार लागू असलेली वयोमर्यादेमधील सवलत आणि इतर अटींच्या माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहावी

वेतनश्रेणी 

निवड झालेल्या उमेदवारांना खालील वेतनश्रेणीनुसार वेतन दिले जाईल.

या पदांसाठी सुरुवातीचे मूलभूत वेतन ₹82,485 असेल. आणि नियमानुसार वेतन वाढ मिळाल्यानंतरचे टप्प्याटप्प्याने ₹1,39,185 पर्यंत जाईल. त्यानंतरच्या वेतन वाढीप्रमाणे कमाल मूलभूत वेतन ₹1,56,745 पर्यंत पोहचेल.

व नियमाप्रमाणे लागू असणारे विविध भत्ते व इतर सेवा-सुविधा दिल्या जातील.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

या पदांचा उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पूर्णपणे काळजीपूर्वक वाचून शैक्षणिक व इतर पात्रता तपासावी.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.
अर्जामध्ये आवश्यक असणारी संपूर्ण माहिती अचूकरित्या भरावी.

भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे सूचनेनुसार अपलोड करावी.
लागू असलेले अर्ज फी ऑनलाइन पद्धतीने भरावे.

अर्ज परिपूर्ण सादर केल्यानंतर अर्जाची पावती किंवा प्रत भविष्यातील संदर्भासाठी सांभाळून ठेवावी.
भरतीसाठी अर्ज दिलेल्या अंतिम मुदतीच्या आत भरावा अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2026 आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईट वरील अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

शैक्षणिक पात्रता, आरक्षण, वयोमर्यादा, कागदपत्रे, अर्जाचे शुल्क, परीक्षा,निवड प्रक्रिया व इतर अटींसाठी अधिकृत जाहिरातीत नमूद असलेली माहिती अंतिम मानली जाईल.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संपूर्ण माहिती अचूक भरावी चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्जाबाबत कंपनीच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

अर्ज करण्याआधी उमेदवारांनी खाली दिलेले कागदपत्रे आवश्यक माहिती तयार ठेवावी.

  1. अलीकडील काळातील पाच फूट आकारातील फोटो
  2. उमेदवाराची सही
  3. डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
  4. हस्तलिखित घोषणापत्र
  5. शैक्षणिक पात्रता कागदपत्रे – पदवी/ पदव्युत्तर प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  6. SSC – 10वी प्रमाणपत्र किंवा जन्मतारखेबाबत पुरावा
  7. जात प्रमाणपत्र लागू असल्यास
  8. दिव्यांग प्रमाणपत्र, लागू असल्यास
  9. आर्थिक दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र, लागू असल्यास
  10. ओळख प्रमाणपत्र तपशील- आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र
  11. सुरू असलेला मोबाईल क्रमांक आणि वैयक्तिक ई-मेल पत्ता.

निवड प्रक्रिया

महत्वाच्या लिंक

जाहिरात PDFयेथे बघा
अधिकृत संकेतस्थळ [ Official Website ]भेट द्या
ऑनलाईन अर्ज लिंकअर्ज करा

Website | + posts

प्रशांत हे Bhartipaper.com चे संस्थापक आणि लेखक आहेत. ते महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील सरकारी भरती, खासगी नोकऱ्या, अप्रेंटिसशिप आणि रोजगाराच्या संधींबाबत मराठी भाषेत माहिती प्रकाशित करतात.

भरतीविषयक लेख तयार करताना अधिकृत जाहिराती, संबंधित विभागांची संकेतस्थळे आणि अधिकृत सूचनांचा आधार घेऊन उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, रिक्त पदे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा यांची माहिती सोप्या व स्पष्ट मराठी भाषेत मिळावी, हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.

Leave a Comment