Assam Rifles Bharti 2026 : असम राइफल्स अंतर्गत 354 रिक्त पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रकाशित!!

Assam Rifles Bharti 2026: गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील असम राइफल्स विभागाअंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत वॉरंट ऑफिसर, हवालदार, आणि रायफलमन या पदांच्या एकूण 354 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये विविध तांत्रिक आणि ट्रेड्समन पदांचा समावेश आहे.

वॉरंट ऑफिसर (सायफर),रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल), रायफलमन (लाइनमन फील्ड),रायफलमन (आर्मरर),रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक),रायफलमन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक),रायफलमन (इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल),हवालदार (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक),रायफलमन (मेटलस्मिथ),रायफलमन (अपहोल्स्टर),रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल,रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक),रायफलमन (वेल्डर),वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन)वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन),वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट),रायफलमन (मेसन) यासारख्या विविध पदांच्या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.यातील काही पदांसाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास तर काही पदांसाठी 12 वी, आयटीआय किंवा संबंधित डिप्लोमा आवश्यक आहे.

काही पदांसाठी अनुभव किंवा आवाहन चालविण्याचा परवाना ही अतिरिक्त अट लागू आहे. भारतीय अर्ज करण्याआधी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य पदाची निवड करावी असम रायफल भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 28 सप्टेंबर 2026 रोजी पासून सुरू तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 ऑक्टोबर 2026 आहे. भरती मेळावा 23 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार असण्याचे नमूद करण्यात आलेले आहे.

असम राइफल्स भरती 2026 विषयी थोडक्यात माहिती

  • घटक तपशील
  • भरती विभाग असम राइफल्स
  • भरतीचे नाव Technical and Tradesman Recruitment Rally 2026
  • एकूण रिक्त जागा 354
  • पदे Warrant Officer, Havildar, Rifleman
  • अर्ज पद्धती ऑनलाइन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 28 सप्टेंबर 2026
  • अर्जाची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2026
  • भरती मेळावा 23 नोव्हेंबर 2026 पासून
  • वय मोजण्याची तारीख 01 जुलै 2026
  • नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
  • अर्ज शुल्क GEN/OBC – ₹100
  • शुल्कातून सूट SC/ST/Ex-Servicemen/महिला उमेदवार
  • अधिकृत वेबसाइट www.assamrifles.gov.in

Assam Rifles vacancy 2026 – पदानुसार रिक्त जागा

असम राइफल्सच्या या भरतीमध्ये विविध तांत्रिक कामांच्या एकूण 17 प्रकारच्या पदांचा समावेश आहे पदानुसार रिक्त जागांची संख्या खालील टेबल मध्ये पहा

अ. क्र.पदाचे नावपदसंख्या
01वॉरंट ऑफिसर124
02रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)32
03रायफलमन (लाइनमन फील्ड)21
04रायफलमन (आर्मरर)29
05रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)10
06रायफलमन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक)13
07रायफलमन (इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल)22
08रायफलमन (मेटलस्मिथ)19
09हवालदार (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)06
10रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल16
11रायफलमन (अपहोल्स्टर)03
12रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक)23
13रायफलमन (वेल्डर)02
14वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन)02
15वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन)01
16 रायफलमन (मेसन)29
17वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट)02
एकूण354

शैक्षणिक पात्रता

असम रायफल technical and tradesman recruitment 2026 भरतीमध्ये प्रत्येक पदाची वेगवेगळे शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्याआधी संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता व इतर अट तपासणे आवश्यक आहे.

रायफलमन – इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल

या पदासाठी 10वी पास असणे आवश्यक आहे आणि संबंधित आयटीआय मधील ट्रेड किंवा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन , पॉवर इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या शाखेतील आवश्यक डिप्लोमा असणे अपेक्षित आहे.

वॉरंट ऑफिसर – सायफर

या पदासाठी उमेदवार बारावी पास असावा तसेच भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी या विषयांचा समावेश असणे आवश्यक आहे यासोबत संबंधित आयटीआय प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन यांसारख्या क्षेत्रातील आवश्यक तांत्रिक पात्रता ग्राह्य धरली जाऊ शकते.

रायफलमन -लाईनमन फिल्ड

उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा त्यासोबत संबंधित आयटीआय ट्रेड किंवा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, OFC यांसारखे क्षेत्रातील तांत्रिक पात्रता आवश्यक आहे.

रायफलमन – आर्मरर

उमेदवार 10वी पास असणे आवश्यक असून संबंधित ट्रेडमधील आयटीआय वेल्डिंग ट्रेड चे प्रशिक्षण आवश्यक आहे.

रायफलमन- इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक

10वी पास उमेदवार या पदासाठी पात्र होऊ शकतात मात्र त्यासोबत संबंधित आयटीआय ट्रेड किंवा इंजीनियर इक्विपमेंट, मेकॅनिक, पॉवर इलेक्ट्रिक सिस्टम्स, मेकॅनिकल डिझेल, यासारख्या ट्रेडमध्ये तांत्रिक पात्रता असावी.

रायफलमन- रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक

या पदाकरिता उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक संबंधित आयटीआय प्रशिक्षण असावे यासोबत जड किंवा वाहतूक वाहन चालविण्याचा वैध परवाना आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

रायफलमन – इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल

या पदासाठी उमेदवार दहावी पास असावा सोबत इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, पावर इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन सिस्टम्स किंवा संबंधित तांत्रिक पात्रता असावी.

हवालदार इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक

या पदासाठी दहावी पास असणे आणि संबंधित आयटीआय ट्रेड प्रशिक्षण आवश्यक आहे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी संबंधित पत्रिका पात्रता असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येईल.

रायफलमन – मेटल रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक

दहावी उत्तीर्ण तसेच आयटीआय प्रशिक्षण किंवा मेटल स्मिथ ट्रेडशी संबंधित पात्रता असणे गरजेचे आहे.

रायफलमन – अपहोल्सस्टर

या पदाकरिता दहावी पास असणे आणि अपहोल्सस्टर ट्रेड मधील संबंधित आयटीआय प्रशिक्षण किंवा समकक्ष तांत्रिक पात्रता आवश्यक आहे.

रायफलमन – स्टोअर कीपर टेक्निकल

या पदासाठी दहावी पास असणे आवश्यक आहे पदाशी संबंधित इतर तांत्रिक अटी लागू असल्यास त्या अधिकृत जाहिरात मध्ये तपासाव्या

रायफल मन व्हेईकल मेकॅनिक

दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडे संबंधित तांत्रिक आयटीआय प्रशिक्षण किंवा मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक डिझेल, फिटर, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा संबंधित टेक्निकल डिप्लोमा असणे गरजेचे आहे.

रायफलमन – वेल्डर

या पदाकरिता दहावी पास असणे आवश्यक आहे त्यासोबतच वेल्डर किंवा धातुशास्त्र संबंधित आयटीआय प्रशिक्षण किंवा समकक्ष पात्रता आवश्यक आहे.

वॉरंट ऑफिसर- ड्राफ्ट्समन

या पदासाठी बारावी पास असणे आवश्यक आहे तसेच आर्किटेक्चरल असिस्टंटशिप मधील डिप्लोमा आवश्यक आहे.

वॉरंट ऑफिसर -ऑपरेशन थिएटर टेक्निशन

बारावी पास असणे आवश्यक आहे तसेच ऑपरेशन थिएटर टेक्निशियन मधील डिप्लोमा किमान 50 खाटांच्या मान्यता प्राप्त रुग्णालयांधेव संबंधित पदावर किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

वॉरंट ऑफिसर – फिजिओथेरपिस्ट

या पदाकरिता बारावी पास आणि फिजिओथेरपी मध्ये आवश्यक डिप्लोमा असणे गरजेचे आहे संबंधित क्षेत्रातून कामाचा अनुभवही आवश्यकतेनुसार ग्राह्य ठरेल. अर्ज करण्याआधी पदानुसार अधिकृत पात्रता तपासणे आवश्यक आहे.

रायफलमन- मेसन

उमेदवार दहावी पास असावा आणि संबंधित कामाचा किमान एक वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

असम राइफल्स भरती 2026 वयोमर्यादा

असम राइफल्स भरतीसाठी वयोमर्यादा 01 जुलै 2026 या तारखेपासून गणली जाणार आहे.
वॉरंट ऑफिसर, सायफर, ड्राफ्ट्समन, ऑपरेशन थिएटर, टेक्निशियन आणि फिजीओथेरपीस्ट या पदांसाठी वय हे 18 ते 25 वर्षे असावे.
आणि रायफल मन आणि हवालदार श्रेणीतील संबंधित पदाकरिता वयोमर्यादा 18 ते 23 वर्षे आहे.
आरक्षण प्रवर्गातील उमेदवारांसाठी शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादेमध्ये सवलत दिली जाऊ शकते प्राप्त माहितीप्रमाणे SC/ST उमेदवारांना 05 वर्षे तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची सवलत आहे.
वयोमर्यादा बद्दल आणि आरक्षण सवलतीच्या अंतिम अटी जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात तपासावी.

असम राइफल्स भरती 2026 अर्ज शुल्क

या भरतीसाठी अर्ज शुल्क पदानुसार दिलेले आहे.
सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.100/- अर्ज शुल्क निश्चित केलेले आहे तर एससी,एसटी माजी सैनिक व महिला उमेदवारांडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
ऑनलाइन अर्ज करताना शुल्क लागू असल्यास ते अधिकृत अर्ज प्रणाली द्वारेच भरावे अर्ज शुल्क भरण्याअगोदर अर्जातील माहिती तपासावी.

असम राइफल्स भरती निवड प्रक्रिया कशी होईल?

आसाम रायफलच्या या भरती रॅलीमध्ये उमेदवारांची निवड विविध टप्प्याद्वारे केली जाऊ शकते भरतीमध्ये शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी, ट्रेड किंवा कौशल्याशी संबंधित परीक्षा, वैद्यकीय तपासणी आणि लागू असल्यास ही तर निवडतात त्यांचा समावेश असू शकतो. प्रत्येक ट्रेडच्या निवडीत प्रक्रियेतील टप्पे किंवा पत्राचा वेगळी असण्याची शक्यता असल्याने उमेदवारांनी संबंधित पदासाठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. तसेच तांत्रिक पदाची संबंधित ट्रेडमध्ये आवश्यक कौशल्य तपासणी जाऊ शकते

असम रायफलमन भरती रॅली 2026

या भरती प्रक्रियेचे रॅली 23 नोव्हेंबर 2026 या रोजी पासून सुरू होणार असून भरती मेळाव्यासाठी उमेदवारांनी प्रवेशपत्र, ओळखपत्र आणि जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे महत्त्वाचे आहे.
भरतीच्या ठिकाणी जाताना उमेदवारांनी वेळ, ठिकाण आणि आवश्यक कागदपत्रंबाबत अधिकृत सूचनांची पालन करावे. भरती रॅलीशी संबंधित वेळोवेळी पुढील जाहीर होणाऱ्या सूचना अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाऊ शकतात.

Assam Rifles Bharti 2026 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

आसाम रायफल्स भारती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असून उमेदवारांनी अर्ज करताना खालील पद्धतीचा अवलंब करावा.
सर्वप्रथम आसाम रायफल च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यानंतर Join assam rifles किंवा technical and traditional recruitment संबंधित अर्ज लिंक क्लिक करून उघडावी.

त्यानंतर आवश्यक वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रतेची व तांत्रिक प्रशिक्षण आणि अनुभव व इतर तपशील अचूकपणे भरावे.
अर्जामध्ये निवडलेल्या पदाचे नाव व संबंधित ट्रेड काळजीपूर्वक तपासावा.

लागणारी कागदपत्रे दिलेल्या निर्धारित स्वरूपात अपलोड करावी शुल्क लागू असल्यास ऑनलाईन माध्यमातून अर्जाचे चलन भरावे.
अर्ज पूर्ण झाल्यानंतर सबमिट करण्याअगोदर संपूर्ण माहिती पुन्हा एकदा तपासून घ्यावी अर्ज यशस्वीरित्या भरल्यानंतर त्याची प्रत किंवा पावती भविष्यातील उपयोगासाठी सांभाळून ठेवावी.

असम राइफल्स भरती अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

भरतीसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची तयारी आधी करून ठेवावी शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका,ITI किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र ओळखपत्र अलीकडील काळातील पासपोर्ट फोटो, तसेच लागू असल्यास जात प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे.

ज्या पदाकरिता वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे, त्या उमेदवारांकडे संबंधित वाहन प्रकाराचा वैद्य परवाना असणे गरजेचे आहे.

आसाम रायफल्स भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत

  • ऑनलाइन प्रक्रियेची सुरुवात : 28 सप्टेंबर 2026
  • ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख: 28 ऑक्टोबर 2026
  • भरती मेळावा सुरू होण्याची तारीख: 23 नोव्हेंबर 2026 पासून

उमेदवारांनी अर्जाच्या शेवटच्या तारखेआधी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता अर्ज करावा त्यामुळे तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्रांचे संबंधित त्रुटी दुरुस्त करण्यासाठी वेळ मिळू शकतो.

महत्त्वाच्या लिंक्स

आसाम रायफल्स भरती संबंधित अर्ज, प्रवेशपत्र, भरती रॅली व इतर अधिकृत सूचना पाहण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटचा वापर करावा. जाहिरात PDF बघण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा PDF देखील अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

जाहिरात PDF:येथे पहा
ऑनलाइन अर्ज :लगेच अर्ज करा
अधिकृत वेबसाइट : https://www.assamrifles.gov.in/

Assam Rifles Bharti 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

Assam Rifles Bharti 2026 साठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात का?

हो आसाम रायफल भरती मधील काही पदांसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात पानपदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे. काही तांत्रिक पदांसाठी 10 वी सोबत संबंधित ट्रेड मधील ITI किंवा डिप्लोमा किंवा इतर तांत्रिक पात्रता आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी संबंधित पदाची पात्रता तपासावी.

Assam Rifles Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

बहुतेक Rifleman आणि Havildar पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 23 वर्षे आहे. Warrant Officer (Cipher), Draughtsman, Operation Theatre Technician आणि Physiotherapist या पदांसाठी वयाची अट 18 ते 25 वर्षे आहे. वय 1 जुलै 2026 या तारखेनुसार गणले जाईल. आरक्षित प्रवर्ग व इतर पात्र उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळू शकते.

Assam Rifles Recruitment 2026 साठी अर्ज कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे?

Assam Rifles Bharti 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 28 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरूनच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

Assam Rifles Bharti 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

आसाम रायफल्स भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2026, रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे. अंतिम तारखेची वाट न पाहता अर्ज पूर्ण करणे योग्य ठरेल.

Assam Rifles Bharti 2026 मध्ये रायफल या पदासाठी सुरुवातीचा पगार किती आहे?

या भरतीमधील अनेक Rifleman पदांचा Pay Level-3 असून वेतनश्रेणी ₹21,700 ते ₹69,100 आहे. ₹21,700 हे सुरुवातीचे बेसिक पे आहे. त्याशिवाय नियमाप्रमाणे लागू भत्ते मिळू शकतात.

Assam Rifles Bharti 2026 मध्ये Havildar आणि Warrant Officer पदांसाठी पगार किती आहे?

Havildar (Instrument Mechanic) पदासाठी Pay Level-4 असून वेतनश्रेणी ₹25,500 ते ₹81,100 आहे. Warrant Officer पदांसाठी Pay Level-5 असून वेतनश्रेणी ₹29,200 ते ₹92,300 आहे. वास्तविक वेतनामध्ये लागू भत्ते व इतर सेवा नियमांचा समावेश होऊ शकतो.

असम रायफल्स भरती मध्ये महिला उमेदवार अर्ज करू शकतात का?

या तांत्रिक आणि ट्रेडसमन रिक्रुटमेंट रॅली 2026 च्या जाहिरातीप्रमाणे दिलेल्या 354 पदांसाठी पात्र उमेदवार पुरुष असल्याचे नमूद आहे त्यामुळे या विशिष्ट भरतीमध्ये महिला उमेदवारांना अर्ज पात्रता लागू होत नाही.

Assam Rifles Bharti 2026 ची शारीरिक चाचणी मध्ये काय पात्रता आहे?

भरती प्रक्रियेत भरती प्रमाण शारीरिक मानक चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमताचा समावेश आहे. उपलब्ध भरती तपशीलाप्रमाणे सामान्य क्षेत्रातील पुरुष उमेदवारांसाठी 5 किमी धावणे 24 मिनिटांत पूर्ण करण्याची अट आहे; विशिष्ट प्रदेशांसाठी शारीरिक निकषांमध्ये बदल असू शकतो. उंची आणि छातीचे निकष देखील लागू आहेत.

Assam Rifles मधील नोकरी कायमस्वरूपातील आहे का?

या भरतीमध्ये Assam Rifles अंतर्गत Group C पदांसाठी भरती केली जात आहे. ही भरती नियमित Group C सेवांच्या नियमांनुसार केली जाते; जाहिरातीमध्ये निश्चित कालावधीची करार पद्धत म्हणून नमूद केलेली नाही. नियुक्तीनंतर सेवा शर्ती Assam Rifles आणि केंद्र सरकारच्या लागू नियमांनुसार असतील.

Website | + posts

प्रशांत हे Bhartipaper.com चे संस्थापक आणि लेखक आहेत. ते महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण भारतातील सरकारी भरती, खासगी नोकऱ्या, अप्रेंटिसशिप आणि रोजगाराच्या संधींबाबत मराठी भाषेत माहिती प्रकाशित करतात.

भरतीविषयक लेख तयार करताना अधिकृत जाहिराती, संबंधित विभागांची संकेतस्थळे आणि अधिकृत सूचनांचा आधार घेऊन उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, रिक्त पदे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा यांची माहिती सोप्या व स्पष्ट मराठी भाषेत मिळावी, हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.

Leave a Comment